बजाज ग्रुपचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. १९६५ मध्ये बजाज समूहाची सूत्रे हाती घेणारे राहुल बजाज ८३ वर्षांचे होते. बजाज यांना न्यूमोनियासह हृदयविकाराचा त्रास होता. गेल्या महिन्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी २.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (bajaj company labour crying for rahul bajaj )
राहूल बजाज यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवड शहरात शोककळा पसरली आहे. या ठिकाणी बजाज कंपनी असून मोठ्य प्रमाणात कामगार वर्ग या ठिकाणी स्थायिक झाला आहे.
रविवारी राहूल बजाज यांचे पार्थिव आकुर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. यावेळी अनेक नेतेमंडळी, कामगार आणि नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यदर्शन घेताना बजाजचे कामगार खुप भावूक झाले होते. राहूल बजाज हे आमच्यासाठी देव आहे, असे त्या कामगारांनी म्हटले आहे.
राहूज बजाज हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांनी आम्हाला जगण्याची एक नवी उमेद दिली. लाखो कुटुंब त्यांनी उभी केली आहे, असे म्हणत कामगारांचे अश्रू अनावर झालेले दिसले. राहूल बजाज यांच्या अशा जाण्याने कामगारांवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे.
राहूल जबाब यांना आम्ही देव समजतो. ते आमचे ईश्वर आहेत. आम्ही साताऱ्याहून आलेलो आहोत. महाराष्ट्र स्कुटरचे कामगार आहोत. २५ वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांनी आमचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला होता. आम्हाला त्यांनी रोजगार दिला. साताऱ्यातील हजारो कुटुंबे त्यांच्यामुळे उभी आहेत, असेही कामगारांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल बजाज यांचा जन्म १९३८ मध्ये झाला. त्यांचे आजोबा जमनालाल बजाज हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी १९२६ मध्ये बजाज कंपनी सुरू केली. जमनालाल बजाज यांचा मुलगा कमलनयन बजाज यांनी १९४२ मध्ये बजाज ग्रुपचा ताबा घेतला आणि त्यानंतर लवकरच बजाज ऑटो सुरू झाली.
महत्वाच्या बातम्या-
कंगना राणावत ‘गेहराइयां’ चित्रपटाला म्हणाली ‘कचरा’, पोर्नोग्राफी चित्रपटांशी केली तुलना
IPL लिलावात हैद्राबाद संघाकडून कोट्यावधींची बोली लावणारी ती ‘मिस्ट्री गर्ल’ कोण आहे?
निकोलस पूरनला लाॅटरी! प्रचंड अपयशी होऊनही मालामाल, मिळवले ‘इतके’ कोटी