प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्याने उडाली खळबळ

गोव्यातील विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने ११ उमेदवार उमेदवार उभे केले आहेत. पक्षाच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्या प्रमाणे शिवसेना महाराष्ट्रात सुशासन देत आहे, त्याच पद्धतीचे सुशासन गोव्यातही शिवसेना देऊ इच्छित असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपावर निशाणा साधला. ‘आमचा उमेदवार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी प्रचाराला जाणार आहे, त्याठिकाणी इतर पक्षाचा कोण उमेदवार आहे हे महत्वाचे नाही. अनेकांकडून प्रचाराला येऊ नका म्हणून फोन आले, कोणत्या पक्षाकडून आले हे आता बोलायला नको,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, मला विश्वास आहे की आमचे सर्व उमेदवार विधानभवनात जाणार आहेत. आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठिमागे गोव्यातील जनता उभी असल्याचे ठाकरे म्हणाले. याचबरोबर दिवंगत मनोहर पर्रिकर यांना न्याय देण्यासाठी उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ‘आम्ही कोणत्या स्पेसिफिक वोटिंगसाठी आलो नाही. जात धर्माची मते घ्यायला आलो नाही. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहोत. जी मैत्री जपली ती खुलेपणाने जपली. जे जपायचं आहे ते स्वच्छपणे केलं आहे. उत्पल पर्रिकरांना साफ आणि स्वच्छ मनाने पाठिंबा दिला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

याचबरोबर “इथून पुढे आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार. गोव्याच्या प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असणार”, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच गेल्या ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. एनडीएमधल्या इतर पक्षांच्या पाठीत देखील खंजीर खुपसला गेला”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला.

तसेच “जर कुणाला आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, आमचे डिपॉझिट जप्त होणार असं वाटत असेल, तर मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता तरी का? होऊ दे प्रचार”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
“चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?”
अरे देवा! वडिलांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांच्या चिमुकलीवर आली कुटुंबाची जबाबदारी, वाचा नेमकं काय घडलं..
धक्कादायक! अवघ्या सहा दिवसाच्या बाळाचा गळा आवळून ताम्हिणी घाटात फेकलं; घटनेनं शहर हादरलं..
नाद नाय! इशान किशन, दीपक चाहरपाठोपाठ हे खेळाडू झाले मालामाल, वाचा खेळाडूंची संपुर्ण यादी