Share

टाटा सुमोच्या नावाची गोष्ट तुम्हाला माहीतीय का? वाचा ती मन हेलावून टाकणारी स्टोरी

रतन टाटा (ratan tata) यांचे नाव ऐकले की सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो. भारत देशाची शान असलेली टाटा कंपनी. टाटा मोटर्सच्या गाड्या या दमदार क्वालिटीसाठी ओळखल्या जातात आणि शिवाय ‘मेड इन इंडिया’. (story of tata motors famous car tata sumo)

अशीच एक टाटा कंपनीची एक गाडी सर्वाना माहीत आहे. ती म्हणजे टाटा सुमो (tata sumo). पण अनेकांना या गाडीच्या नावाची खरी कहाणी माहीत नसावी. सगळ्यांना वाटते की या गाडीच्या आकारावरून या गाडीचे नाव ठेवण्यात आले आहे. पण खरी कहाणी वेगळीच आहे.

टाटा मोटर्स जगातील सर्वात जास्त वाहन विक्री करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. भारतात आणि जगभरात अनेक लोक टाटा मोटर्सच्या गाड्या घेतात. त्यातीलच एक गाडी आहे टाटा सुमो. ही गाडी त्या काळातील सर्वात जास्त विक्री झालेली गाडी आहे.

टाटा सुमोचे नाव त्यांच्या कंपनीचे माजी एमडी सुमंत मांळगावकर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. रतन टाटा हे कर्मचार्‍यांचे हित लक्षात घेऊन कार्य करतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

त्यांच्या नावाच्या पहिल्या आणि दुसऱ्या अक्षराच्या सुरुवातीच्या शब्दांना घेवून हे नाव ठेवण्यात आले आहे. हे नाव टाटा मोटर्ससाठी खूप लकी ठरले आणि ही कार लॉन्च झाल्यानंतर त्या कारची खूप विक्री होऊ लागली. ट्रॅव्हल्स आणि मोठ्या गाडीची ज्यांना गरज आहे अशा लोकांनी या गाडीला खूप पसंती दिली आहे.

टाटा मोटर्सने रिअर व्हील ड्राइव्ह एसयूव्ही टाटा सुमो ही १९९४ मध्ये लॉन्च केली होती. ही १० सीटर कार होती. तसेच याला सैनिकी ट्रायल आणि ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या उद्देशाने तयार करण्यात आले होते. ही एसयूव्ही लॉन्च झाल्यानंतर हिची मोठ्या प्रमाणत विक्री झाली होती. १९९७ नंतर १ लाखांहून अधिक टाटा सुमोची विक्री झाली होती.

महत्वाच्या बातम्या
व्हेंटिलेटरचे नाव ऐकूनच भरते धडकी; जाणून घ्या काय आहे उपयोग आणि कधी लावतात व्हेंटिलेटर
पुर्ण देशालाच कोरोनाने घेरले होते, तो महाराष्ट्रातूनच पसरला असं कसं म्हणता? सोनू सुदचा रोखठोक सवाल
टाटाच्या ‘या’ कंपनीचा शेअर ठरला सुपरहिट, वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला १६८ टक्के रिटर्न
१ लाखाची लाच घेताना पकडलं तरी महिला अधिकाऱ्याचे हसू थांबेना; म्हणाली, प्रसादाला नाही कसं म्हणू

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now