रविवारी (६ फेब्रुवारी) रोजी सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांचा विवाह सोहळा लातूरमध्ये पार पडला. कार्निवल हॉटेलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. (dhananjay munde dance video)
या लग्न सोहळ्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी दोघांनी एकत्र बसून जेवण केले. सोशल मिडियावर त्यांचे फोटो देखील चांगलेच व्हायरल झाले होते. तर आता धनंजय मुंडे यांचा एका लग्नसोहळ्यात नववधू आणि नवरदेवासोबत नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल होतं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
धनंजय मुंडे यांनी वधू आणि वरासबोत ‘आपका क्या होगा जनाबे आली’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळाला. धनंजय मुंडे डान्स करत असल्याचं पाहून उपस्थितही यावेळी त्यांच्यासोबत डान्स करत तसंच आवाज देत उत्साह वाढवत होते.
https://twitter.com/ssidsawant/status/1490735730712145920?s=20&t=7MWr7G36xH6BmRQwMT1adg
व्हिडिओ मध्ये बेभान होऊन धनंजय मुंडे वरातीचा आनंद घेताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये नवरदेव-नवरीच्या हाताला धरून मुंडे डान्स करताना पाहायला मिळत आहेत. नेहमी आपल्या आक्रमक स्वभावाने चर्चेत असणाऱ्या मुंडेंचा हा अनोखा अंदाज पाहून त्यांचे चाहतेही भलतेच खूश झाले आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडे आणि आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांच्या विवाह सोहळ्यात दोघेही एकत्र दिसून आले आहे. त्यांनी तब्बल दोन तास एकमेकांशी संवाद साधला. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
तसेच अनेकदा त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर लोकांनी त्यांना बघितले आहे, पण या सोहळ्यात ते तब्बल दोन तास सोबत होते. मागच्या अनेक दिवसांपासून दोघेही मनमोकळ्यापणाने गप्पा मारताना दिसून आले नव्हते. पण या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ते दोघेही एकत्र दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
पंजाबमध्ये काँग्रेस किंवा भाजप नाही तर ‘या’ पक्षाची सत्ता येणार, पोलमधून मोठी माहिती समोर
40 हजारांच्या व्याजापोटी वसूल केले 8 लाख; सावकाराने वृद्ध महिलेला अक्षरश भीक मागायला लावली
ह्युंदाईनंतर केएफसीनेही केले काश्मीरबद्दल ट्विट; संतापलेले नेटकरी म्हणाले, भारत सोडून निघून जा तुम्ही
मॅन विथ गोल्डन हार्ट: सुनील ग्रोवरच्या तब्येतीची सलमान घेतोय काळजी, डॉक्टरांना दिला हा सल्ला