ब्राझीलमध्ये कपडे धुत असताना एका महिलेचा अचानक मृत्यू झाला. अनेक लोकांना प्रश्न पडला होता की तिचा मृत्यु झाला कसा? पण आता हे रहस्य उलगडले आहे. वॉशिंग मशिनला (washing machine) स्पर्श करताच तिला विजेचा झटका (electric shock) बसला, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
तिला मशिनच्या उघड्या तारेचा विजेचा शॉक लागल्याचा संशय आहे. प्राथमिक तपासात 27 वर्षीय टास डी ऑलिव्हेरा रोस्टच्या मृत्यूमागे इलेक्ट्रिक शॉक असल्याचे म्हटले आहे. सध्या पोलीस पथक उर्वरित तपास आणि पोस्टमॉर्टममध्ये गुंतले आहे. टास डी ऑलिव्हेरा घरी नेहमीप्रमाणे रोजचे कपडे धुत होती. घरातील सर्व कामे ती स्वतः करत असे.
तिला एक 4 वर्षांची मुलगी देखील होती जी त्याच्यासोबत राहात होती, पण त्या दिवशी कपडे धुताना इतका मोठा अपघात होईल याची थोडीपण कल्पना तिला नव्हती. अपघाताच्या वेळी तिचा प्रियकर विल्यम घराबाहेर होता, घरी पोहोचताच त्याला धक्काच बसला. त्याने गर्लफ्रेंड ऑलिव्हिराला जमिनीवर पडलेले पाहिले. ती शुद्धीवर नव्हती.
विल्यमने तिला थोडं हलवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती. त्याने तातडीने एमरजेंसी सेवेला फोन केला. डॉक्टर तातडीने तेथे पोहोचले पण त्यांनीही खुप प्रयत्न केले असता तिचा मृत्यु झाला आहे त्यांना समजले. द सनच्या वृत्तानुसार, ज्या वेळी ऑलिव्हेरचा मृत्यु झाला त्या वेळी ती ब्राझीलच्या एका शहरात एकटी राहत होती. त्यावेळी बॉयफ्रेंड विल्यम घरात नव्हता.
रिपोर्टनुसार, तिने 1 महिन्यापूर्वीच विल्यमला डेट करायला सुरुवात केली होती. विल्यमनेच तिला पहिल्यांदा घरी मृतावस्थेत पाहिले होते. विल्यमने सोशल साईटच्या माध्यमातून गर्लफ्रेंड ऑलिव्हेराला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘तू माझ्या आयुष्यात येणारी सर्वात खास व्यक्ती होतीस, मी तुझ्यावर आज आणि नेहमीच प्रेम करेन.
या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सोशल मिडीयावरही या घटनेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. विल्यमलाही अनेकांनी धीर दिला आहे. तसेच वॉशिंग मशिन वापरताना किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन वापरताना दक्षता घेण्याचे आवाहन नेटकऱ्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
lata mangeshkar health update: लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत खोट्या बातम्या व्हायरल, तब्येतीत झालीये सुधारण
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘या’ कारणामुळे ‘अला वैकुंठपुरमलो’ सिनेमागृहात होणार नाही प्रदर्शित
‘ना धर्म बदलणार ना देश सोडणार’, अविनाशने आपल्या अटींनुसार मोरक्कोच्या फादवा बरोबर केलं लग्न
पत्नीने न सांगता खरेदी केला मोबाईल, संतापलेल्या पतीने उचचले टोकाचे पाऊल, वाचून हादरा बसेल