मुंबई म्हणलं की गजबजलेलं शहर अशी ओळख आहे. छोट्या छोट्या जागी लोक राहून जीवन काढतात. अगदी गल्ली बोळ्यानं लोक तिथं राहतात. त्यात रेल्वे रुळाशेजारी तर लोकांनी वस्ती केली आहे. या परिसरात साधारण 7 हजारांच्या वरती बेकायदा झोपडपट्ट्या आहेत. आता या झोपड्यांना हटवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यास राष्ट्रवादीच्या मंत्र्याने विरोध दर्शविला आहे.
मुंबईतील मालाड, कांदिवली स्थानकादरम्यानच्या आणि इतरही अनेक रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्या रेल्वे मंत्रालयाने जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाई आधी रेल्वे प्रशासनाने रीतसर नोटीस बजावली होती. परंतु, झोपडीधारकांनी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. परंतु रेल्वेने कोणतीही पर्यायी जागा न देता पोलिसांच्या मदतीने सर्व झोपडपट्ट्या हटवल्या आहेत. यामुळे शेकडो कुटुंबांवर आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.
अशा परिस्थितीत राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाच्या या कारवाईचा विरोध केला आहे. ते म्हणतात, “सर्वोच्च न्यायालयाचा असा कुठला तरी निर्णय आला आहे, ज्यामध्ये म्हंटलं आहे की, शासकीय जमिनांवरची अतिक्रमणं साफ करा. मुंबईतच कमीत कमी दोन पाच लाख घरं साफ करावी. देशभरात अशी लाखो लोक असतील. त्यामुळे या निर्णयाचा मी सन्मानपूर्वक विरोध करतो.”
तसेच म्हणाले, “आता यासाठी गरिबांच्या बाजूनं उठावं लागेल, उभा राहावं लागेल, त्यांच्यासाठी लढावं लागेल. गेली 70 वर्षांपासून ते लोक रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहत आहेत. आज तुम्ही त्यांना सांगाल की, या घरातून चालते व्हा तर त्यांनी जायचे कुठे? त्यांची पर्यायी व्यवस्था काय आहे?” असा सवाल त्यांनी केला आहे.
त्यांनी ट्विट करून लिहिले की, “गेली 70 वर्षांपासून रेल्वे रुळाच्या बाजूला राहत असलेल्या रहिवाशांना सेंट्रल रेल्वे तर्फे नोटीसा देण्यात आल्या आहेत की, त्यांनी 7 दिवसाच्या आत घरे खाली करावीत. मात्र, हे माणुसकीला धरून नाही. संपुर्ण मुंबईभर लाखो लोक रेल्वे रुळापासून 15- 20 फुटांवर राहतात.”
https://twitter.com/Awhadspeaks/status/1483360236022878208?t=QdpslzvEuz9VvWHyOcF69A&s=19
“अचानक असे काय झाले कि त्यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा काढण्यात आल्या तेही 7 दिवसांत. पर्यायी व्यवस्था करा आणि त्याच्या नंतरच ते घरे खाली करतील. अन्यथा आम्ही त्या गोर गरीब लोकांबरोबर उभे राहू. मनामनी चालणार नाही.” असे त्यांनी ट्विट करत रेल्वे प्रशासनावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मराठी शाळा जगवण्यासाठी प्रयत्न न करता मुंबईत उर्दू शाळा वाढवण्याचा ठाकरे सरकारचा घाट’
नाना पटोलेंचा पाय खोलात; भाजपाकडून पोलिसात तक्रार दाखल, अटकेची केली मागणी
”नाना पटोलेंची जीभ कापा अन् 1 लाखांचं बक्षीस मिळवा!”