‘अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना’

मुंबई | रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून अलिबागला नेलं आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे. गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यासह केंद्रातील भाजपा नेते आक्रमक झाले असून ठाकरे सरकारवर टीका करत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भातखळकर म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये,’ अशा तिखट शब्दात भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आहे. पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकलं असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

याचबरोबर ‘काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
अर्णबला भेटायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांना पोलिसांनी उचलून फेकून दिले
“अर्णब यांच्या तोंडातून काही नावे बाहेर पडतील अशी भाजपला भिती”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.