राजस्थानच्या जोधपूरमधून फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिलेला तिच्या पतीच्या वाढदिवशी सरप्राईज देणे महागात पडले आणि तिचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. खरं तर, पत्नीला तिच्या नवऱ्याच्या वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट म्हणून एक प्लॅट द्यायचा होता. पण त्या महिलेची लाखो रुपयांची फसवणूक झाली.
याप्रकरणी आता पती-पत्नीने मिळून पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एसएचओ दिनेश लखावत यांनी सांगितले की, अभिषेक जैन आणि प्रियंका जैन यांनी पोलिस ठाण्यात नितीन सिंह सिसोदिया आणि मनसुख सोनी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की प्रियांकाने 17 डिसेंबर 2021 रोजी पती अभिषेकला त्याच्या वाढदिवशी सरप्राईज देण्यासाठी दोघांचा मित्र नितीन सिंगला सांगितले होते की तिला तिच्या पतीला एक फ्लॅट भेट द्यायचा आहे.
यावर नितीन सिंह यांनी त्यांची मनसुख सोनी नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. नितीन सिंग सिसोदिया यांनी प्रियंका यांना सांगितले की, मनसुख सोनी यांना पैशांची गरज आहे. ज्यावर प्रियांकाने पती अभिषेकला न सांगता 5 डिसेंबर 2019 रोजी वकील अनिल शर्मा यांच्यासमोर मनसुखला 9 लाख रुपये देऊन करार केला.
त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये नितीन सिंह यांनी प्रियांकाला सांगितले की इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच त्यांना फ्लॅट मिळेल आणि तुम्ही 20 हजार रुपये मासिक हप्ता भरत राहा. जेणेकरून अंतिम पेमेंटच्या वेळी तुम्हाला नंतर कोणतीही अडचण येणार नाही.ऑगस्ट 2021 पर्यंत प्रियांकाने नितीन सिंगला दरमहा 20 हजार रुपये दिले.
मात्र त्यानंतर कागदपत्रे मागितल्यावर त्यांनी टाळाटाळ सुरू केली. मुलाला किडनॅप करण्याची धमकी दिली. यानंतर प्रियांकाने हा संपूर्ण प्रकार पती अभिषेकला सांगितला. त्यामुळे त्यांनी नितीन सिंग सिसोदिया आणि मनसुख सोनी या दोघांकडेही कागदपत्रे मागितली, मात्र त्यांनी ती दिली नाहीत. नितीन सिंग हे विद्युत विभागात सरकारी कर्मचारी आहेत.
फ्लॅटची माहिती गोळा केली असता, या फ्लॅटवर मनसुख सोनी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये बँकेकडून कर्जही घेतले असल्याचे समोर आले. यानंतर नितीन यांनी महिलेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. फ्लॅटचे बुकिंग प्रियांकाच्या नावावर झाले नव्हते, आता या प्रकरणी प्रियांकाने सरदारपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
तारक मेहता… शोमध्ये बबिताजींना टक्कर देण्यासाठी आली ‘ही’ बोल्ड अभिनेत्री; फोटो पाहून उडेल झोप
राज्यात पुन्हा शाळा कधी सुरू होणार? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची बातमी
PHOTO: उर्फी जावेदने पॅन्टचे बटन उघडे ठेवूनच केले फोटोशुट, लोकं म्हणाले, मॅडम तुमचा लेटरबॉक्स उघडा आहे
या अभिनेत्याने रेखासोबत अंघोळ करण्याचा धरला होता हट्ट, अशी होती रेखाची प्रतिक्रिया