केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मुंबईतील मीरारोडची भावना यादव ही देशात १४वी आली आहे. पण मुलींमध्ये देशात भावना पहिली आली आहे. केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट या पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई पोलीस दलातील सहाय्यक फौजदार सुभाष यादव यांची भावना मुलगी आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ४ जानेवारीला जाहीर केला होता. या परीक्षेमध्ये भावना यादव हिने १४ वा क्रमांक पटकावला आहे. भावना यादव मीरारोड भागातील न्यू ओम कॉम्प्लेक्स या इमारतीत तिच्या कुटुंबियांसोबत राहत आहे.
या परीक्षेत भावना मुलींमधून देशात पहिली आली आहे आणि महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे. अंधेरीच्या सेंट झेवियर्स या विद्यालयात भावना यादव हिचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. तिचे महाविद्यायलयीन शिक्षण विरारच्या विवा महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. भावनाने एमएस्सी पर्यंत केले आहे.
भावना यादव हिचे वडील सुभाष यादव हे बोरिवली येथील वाहतूक शाखेत सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत आहेत. भावना यादव हिचे मूळ गाव सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी आहे. भावनाला सुरवातीपासून केंद्रीय सेवेत जाण्याची इच्छा होती. २०१५ सालापासून ती केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत होती .
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असताना तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा भावना दोन वेळा उत्तीर्ण झाली होती. पण मैदानी परीक्षेत तिला अपयश आले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देखील शारीरिक चाचणीत ती अपयशी ठरत होती.
अपयश मिळून देखील भावनाने जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. भावनाला तिच्या कुटुंबियांकडून नेहमीच प्रोत्साहन मिळाले. तेलंगणा मधील पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी भावना हिला सातत्याने मार्गदर्शन आणि मोलाचे सल्ले दिले होते. भावना यादव हिने वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मारण्याची धमकी देणाऱ्या महीलांना दुकानदाराने चोपले, प्रत्येक पुरूष मार खात नसतो; व्हिडीओ व्हायरल
‘मकडी’ चित्रपटातील ‘ही’ बालकलाकार अडकली होती सेक्स रॅकेटमध्ये; जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हणाली…
सेकंडहॅंड गाडी घ्यायचा विचार करताय? ‘या‘ गोष्टी चेक करा व टाळा फसवणूक