नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. यावेळी, भाजपचे राजन तेली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. अखेर सुशांत नाईक यांचा विजय झाला. याबद्दल शिवसेनेकडून पोस्टर लावले गेले होते. मात्र याच पोस्टर वरून आता शिवसेनेमधील गटबाजी समोर आली आहे.
सुशांत नाईक यांचा विजय झाल्यानंतर त्याचे अभिनंदन करणारे पोस्टर कणकवलीतील शिवसैनिकांनी लावले होते. मात्र या पोस्टरवरती पालकमंत्री उदय सामंत यांचा फोटो नव्हता. त्यामुळे कणकवलीतील शिवसैनिकांनी शिवसेनेचचं पोस्टर फाडलं आहे. या पोस्टरवर आमदार, खासदार, स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांचे फोटो होते. पण पालकमंत्री उदय सामंत यांचा फोटो पोस्टरवर नव्हता. त्यामुळे उदय सामंत यांच्या समर्थकांनी ते पोस्टर फाडले. त्यामुळे, सिंधुदुर्गात शिवसेनेमधील गटबाजी समोर आली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप समर्थक आमनेसामने आले होते. अखेर निवडणुकीत भाजपलाच सर्वाधिक जागांवर यश आलं. १९ जागांच्या निवडणुकीत भाजपला ११ जागांवर यश मिळालं होतं. तर, महाविकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा मात्र पराभव झाला होता.
या निकालामुळे राजन तेली नाराज झाले होते. त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता. राजन तेली यांचा १५ मतांनी पराभव झाला होता. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे नातेवाईक सुशांत नाईक यांचा विजय झाला होता. त्यांना ७८ मतं मिळाली होती तर राजन तेली यांना ६३ मतांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे भाजपपुढे गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली होती.
राजन तेली यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या अनेक पक्षश्रेष्ठींकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील झाला. सुशांत नाईक यांचा या निवडणुकीत विजय झाल्यामुळे कणकवलीमधील स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुशांत नाईक त्यांचे अभिनंदन करणारे पोस्टर लावले होते. या पोस्टरमध्ये आमदार, खासदार, स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांचे फोटो होते.
मात्र, उदय सामंत यांचा यामध्ये फोटो नव्हता. यामुळे, शिवसेनेमधील उदय सामंत यांच्या समर्थकांनी कणकवली मधील हा पोस्टर फाडून टाकला. पालक मंत्री उदय सामंत बँक निवडणुकीत जाणीवपूर्वक दूर राहिले असा शिवसैनिकातील एका गटाला संशय होता. त्यामुळे त्यांनी पोस्टर वरती उदय सामंत यांचा फोटो लावला नाही असे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
बदलणारा समाज! समलैंगिक विवाहदेखील थाटामाटात; गाजावाजासह निघत आहे मिरवणूक
फोटोसोबत मुस्लिम महिलांचा सोशल मिडीयावर होत होता लिलाव, लोकं भडकल्यानंतर गुन्हा दाखल
काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप तिघे एकत्र आले तरी शिवसेना तिघांनाही पुरून उरली; तब्बल ४ जागा जिंकत बनली किंगमेकर