Homeताज्या बातम्याकाॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप तिघे एकत्र आले तरी शिवसेना तिघांनाही पुरून उरली; तब्बल...

काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप तिघे एकत्र आले तरी शिवसेना तिघांनाही पुरून उरली; तब्बल ४ जागा जिंकत बनली किंगमेकर

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी गटाने त्यांच वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ऐन वेळी तयार केलेल्या शिवसेनेच्या पॅनेलनं सत्ताधारी पॅनेलची धडकी भरवली आहे. सध्या सत्ताधारी गटाचे ११ उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना गटाचे तीन उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार असे चार उमेदवार शिवसेनेच्या बाजूने झाले आहेत.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच सहा जण बिनविरोध झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना किंगमेकर राहील असा दावा खासदार संजय मंडलिक यांनी केला होता. तो दावा आज झालेल्या निवडणुकीत खरा ठरला आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत.

या निवडणुकीत आमदार प्रकाश आवडे त्याच बरोबर काही विद्यमान संचालक देखील पराभूत झालेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या पॅनेलचे ४ उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेकडून राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी (विरोधक) पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलकडून खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आणि अर्जुन आबिटकर विजयी झाले आहेत.

या निवडणुकीआधी आबिटकर बंधूंवर जोरदार टीका झाली होती. आबिटकर बंधूमुळेच निवडणूक लागली अशी टीका सत्ताधारी गटाने केली होती. मात्र आपण उमेदवारीसाठी पात्र होतो हे अर्जुन अबिटकर विजयी होऊन यांनी दाखवून दिलं आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. त्यांच्यासोबत आमदार विनय कोरे, सुधीर देसाई, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने आणि राजू आवळे विजयी झाले आहेत.

या निवडणुकीआधी एकूण सहा उमेदवारांची निवड बिनविरोध झाली होती. आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी.एन.पाटील, राजेश पाटील, ए. वाय पाटील, आणि अमर महाडिक हे उमेदवार कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी बिनविरोध निवडून गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
कोर्टाने ६७ वर्षीय व्यक्तीची जप्त केली कवळी, सेक्सवेळी बायकोला रक्त येईपर्यंत चावायचा
”पोलिस म्हणाले, प्रधानमंत्री येत आहेत, आम्हाला वाटलं पोलिस खोटं बोलत आहेत”
बुली बाई ऍप: नेपाळी युवकाचे मुंबई पोलिसांना खुल्ले आव्हान, म्हणाला, हिम्मत असेल तर अटक करून दाखवा