Share

तरुणीने विमा एजंटला व्हिडिओ कॉल करून काढले सगळे कपडे; मग सुरु झाला भयंकर खेळ ..

बिहार मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या मोबाईवर एका तरुणीचा व्हिडीओ कॉल आला. त्या तरुणाने तो व्हिडिओ कॉल उचलला. दुसऱ्या स्क्रीनवर एक तरुणी होती. तरुण काही बोलणार तेवढ्यातच त्या समोरच्या तरुणीने कपडे काढण्यास सुरूवात केली. एक-एक करून त्या तरुणीने अंगावरील सगळे कपडे काढले.

त्या तरुणाने कसाबसा फोन ठेवला. पण त्या तरुणाला माहित नव्हतं की, हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जात होता. काही वेळानंतर त्या तरुणाला धमकीचे फोन येण्यास सुरूवात झाली. या तरुणाला ब्लॅकमेल केलं जाऊ लागलं. या प्रकारामुळे तो तरुण घाबरून गेला. ही संपूर्ण घटना बिहारची राजधानी असलेल्या पटनाजवळील दानपूर शहरात घडली आहे.

दानपूर शहरातील एका तरुणाला एका तरुणीचा फोन आला. तरुण विमा विकणारा एजंट होता, म्हणून तरुणीने त्याच्याकडून त्याचा व्हाट्सअप नंबर घेतला. ‘माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा विमा काढायचा आहे, त्यामुळे मी लवकरच फोन करेन’, असे त्या तरुणीने तरुणाला सांगितले होते. त्याच रात्री त्या तरुणीचा तरुणाला व्हिडीओ कॉल आला.

सुरुवातीला बोलून झाल्यानंतर काहीवेळातच तरुणीने व्हिडीओ कॉलवर कपडे काढण्यास सुरूवात केली आणि तरुणाशी अश्लील संभाषण देखील सुरू केले. तरुणाने थोड्या वेळाने फोन कट केला. पण त्या तरुणाला अंदाज नव्हता की, आता ती तरुणी त्याच्यासोबत काय करणार आहे. अचानक तरुणाच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट्स आणि व्हिडीओ क्लिप्स आल्या.

ज्यात ती तरुणी नग्न अवस्थेत त्याच्यासोबत बोलत होती. हे फोटो पाहिल्यानंतर त्या तरुणाला धक्का बसला. थोड्या वेळाने तरुणीने त्या तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. माझ्या खात्यावर लगेच ५० हजार रुपये पाठव नाहीतर हे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी त्या तरुणीने दिली. मात्र त्या तरुणाने पैसे पाठवण्यास नकार दिला.

त्यानंतर मुलीसोबत असलेल्या इतर आरोपींनी त्या तरुणाला फोन केला. “या प्रकरणात तुझ्यावर कारवाई होईल. कारवाई टाळायची असेल तर पैसे पाठव”, अशी धमकी आरोपीने त्या तरुणाला दिली. पण त्यानंतर देखील तरुणाने आरोपीला पैसे पाठवले नाही. तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी मिळून तरुणाला खूप वेळा फोन केला आणि धमकी दिली.

अखेर तरुणाने सायबर सेलमध्ये जाऊन त्या तरुणीची आणि तिच्या गँगची तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. बिहारमधील ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अनेक जणांना अशाप्रकारे गंडा घालून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
आणखी एका महाराजाचे गांधीजीं विरोधात वक्तव्य; म्हणाले गांधी तर देशद्रोही, त्यांच्यामुळे फाळणी झाली..
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही, मात्र…; वाचा काय झाला मंत्रिमंडळाचा निर्णय
तिसरी लाट भीषण, 80 लाख लोकांना संसर्गाची भीती

इतर

Join WhatsApp

Join Now