Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही, मात्र…; वाचा काय झाला मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही, मात्र…; वाचा काय झाला मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, याबाबत निर्बंध कठोर होणार आहेत. राज्यमंत्री मंडळाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचा बाधितांचा आकडा वाढत आहे. याबाबतीत आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात कोरोना विषयावर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवारांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, सार्वजनिक आरोग्य आयुक्त व्हीसीद्वारे उपस्थित होते. यावेळी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यासाठी नवे आदेश लागू करणार आहोत, असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतल्यानंतर नवे निर्बंध लावणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. हे निर्बंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी जाहीर होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याचवेळी कोरोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत आढवा बैठकीत झाले आहे. आता या बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊन लागण्याची धास्ती संपली आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकते. राज्य सरकार हा धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत. तशी नियमावली आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकारप्रमाणे ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमा गृहात उपस्थिती ५० टक्के होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :-
तिसरी लाट भीषण, 80 लाख लोकांना संसर्गाची भीती
कोरोना झालेली नर्स ४५ दिवसांपासून गेली होती कोमात, व्हायग्राचा एक हेवी डोस देताच आली शुद्धीवर
गांधींना शिव्या देणाऱ्या कालिचरनला महाराष्ट्र शिकवणार धडा; महाराष्ट्र पोलीसांनी घेतला ताबा