साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर का आली सर्वांपासून तोंड लपवायची वेळ? जाणून घ्या कारण

अभिनेत्री सहसा त्यांचा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहत नाहीत. कारण कुठेही गेले तरी त्यांचे चाहते त्यांचा पाठलाग सोडत नाही. पण दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हीने यावर भन्नाट शक्कल लढवली आहे. तिने बुरखा घालून चित्रपटगृहात तिचा चित्रपट पहिला आहे. अभिनेत्री साई पल्लवीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री साई पल्लवीने चित्रपटगृहात चाहत्यांमध्ये बसून तिचा चित्रपट पाहिला आणि त्याचा आनंद घेतला आहे. यादरम्यान तिला कोणी ओळखूही शकले नाही आणि तिचा चित्रपट पाहून ती आरामात घरी परतली. आता इंटरनेटवर एक व्हिडिओ आला आहे, ज्यामध्ये तिचे वेगळेपण समोर आले आहे.

सर्वसामान्यांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्यांनाही चित्रपटाचे वेड लागले आहे. याचा नुकताच पुरावा समोर आला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचली. तिचा चित्रपट पाहण्यासाठी ती बुरखा घालून आली होती. सर्वसामान्यांप्रमाणेच सिनेतारकांना सिनेमा बघायला सिनेमागृहात जाता येत नाही, म्हणून तिने हा मार्ग स्वीकारला.

नुकताच साई पल्लवीचा तेलगू चित्रपट “श्याम सिंघा रॉय” प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशा परिस्थितीत साईलाही तिचा चित्रपट पाहावासा वाटला. म्हणून साई पल्लवीने चाहत्यांमध्ये बसून तिचा चित्रपट पाहिला.

साई पल्लवीने तिच्या चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या राहुल सांकृत्यायनसोबत हा चित्रपट पहिला. चित्रपट पाहून झाल्यांनतर साई पल्लवीने तिचा चित्रपटगृहातील अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला. या व्हिडिओमध्ये ती बुरखा परिधान केलेली दिसते. व्हिडिओच्या शेवटी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी तिचा चेहरा दाखवते.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या खूप कंमेंट आल्या आहेत. काही चाहत्यांनी तिच्या या धाडसाचे कौतुक केले आहे, तर काही चाहत्यांनी या व्हिडिओवर गमतीशीर कंमेंट केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
‘शमिताला वोट करा यावेळी ती जिंकलीच पाहिजे’, शिल्पा शेट्टीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
VIDEO: बिग बॉस विनर विशाल निकमने दिलेले वचन केले पुर्ण, शिवलीला पाटील यांची भेट घेत म्हणाला..
रोहनमसोबतच्या ब्रेकअपबाबत सुष्मिताचा मोठा खुलासा, म्हणाली, ‘मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले’