Share

शिवसेनेच्या ९२ वर्षांच्या फायर ब्रँड आजी मुख्यमंत्र्यांसाठी मैदानात; म्हणाल्या, तो रिक्षावाला…

गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे सध्या हे आसाममध्ये तळ ठोकून आहेत. (92 year old women cm uddhav thackeray)

एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.

आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक चांगलेच तापले होते. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन करत आहे. अशात ९२ वर्षांच्या फायर ब्रँड आजी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरल्या आहे. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

तुम्ही काळजी करु नका शिवसैनिक तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही काळजी घ्या. तो रिक्षावाला होता, तो आमदार खासदार झाला. तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, असं ९२ वर्षांच्या आजीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितले आहे. त्यामुळे या आजी चांगल्याच चर्चेत आल्या आहे.

तसेच कट्टर शिवसैनिक साहेबांकडे माघारी येतील. जे गेले ते शिवसैनिक नाहीत. एकनाथ शिंदे माफी मागायला येतील. उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाणार नाहीत, असेही त्या फायर ब्रँड आजी म्हणाल्या आहे. कट्टर शिवसैनिक असलेल्या या आजी याआधीही चर्चेत आल्या होत्या.

गेल्यावेळेस या आजींनी राणा दाम्पत्याला विरोध केला होता. राणा दाम्पत्याविरोधात जेव्हा कट्टर शिवसैनिक आंदोलन करत होते. तेव्हाही आजी या आंदोलनात उतरल्या होत्या. या आजींचे नाव चंद्रभागा शिंदे असे आहे. त्यांच्या पुष्पा स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून होते.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: मुंबईच्या या फलंदाजाने सिद्धू मुसेवालाला वाहिली अनोखी श्रद्धांजली, मैदानावरच कोसळले रडू
VIDEO: टॉपलेस होऊन उर्फीने अंगावर गुंडाळली वायर, आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ
“उद्धवसाहेब तुम्हाला माफ करतील, तुम्ही सगळे परत या…”, आमदार संतोष बांगर ढसाढसा रडले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now