Share

आजी काळजी घ्या! ९२ वर्षांच्या आजींना मातोश्री बाहेर पाहून मुख्यमंत्रीही गेले भारावून, केली विचारपूस

राज्यात सध्या मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालिसाच्या पठणावरुन वाद सुरु आहे. अशात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. त्यामुळे हा वाद आता वाढताना दिसून येत आहे. (92 year old women at matoshree)

राणा विरुद्ध शिवसेना हा वाद गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. राणा दाम्पत्यांनी इशारा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मातोश्री बाहेर शुक्रवार पासूनच पोलिसांचा कडेलोट बंदोबस्त असल्याचे दिसून आले. अशात मातोश्रीच्या बाहेर असलेल्या शिवसैनिकांमधल्या एक ९२ वर्षांच्या आजी चांगल्याच चर्चेत आल्या आहे.

आजी राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी मातोश्रीच्या बाहेर थांबल्या आहे. त्यामुळे आता याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आजींची विचारपूस केली आहे. एवढंच नाही, तर आजी काळजी घ्या, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

९२ वर्षे वय असणाऱ्या आजीचे नाव चंद्रभागा असे आहे. या आजी सकाळपासूनच मातोश्रीच्या बाहेर पहारा देत आहे. जे कोणी आमच्या वहिनींना, साहेबांना त्रास देताय, त्यांना आम्ही इंगा दाखवणारच, असा इशारा चंद्रभागा आजींनी त्या राणा दाम्पत्याला दिला आहे.

राणा आलेत ना, दोन दिवस त्रास देतायत मातोश्रीवर. आमच्या वहिनींना त्रास देताय ना, म्हणून आम्ही त्यांना इंगा दाखवणार आहोत. तुमची हिंमत कशी झाली? आमच्या साहेबांवर आलेलं संकट आम्ही दूर करणार, साहेबांसाठी आम्ही झटणार. राणांना वाटत असेल दोन्ही जण गुपचूप जाऊ पण आम्ही भिणार नाही, असे त्या आजींनी म्हटले आहे.

तसेच मी बाळासाहेब होते, तेव्हापासून शिवसैनिक आहे. तेव्हापासून मी मातोश्रीवर येते. साहेबांनाही भेटले होते मी. काही लोक उद्धव साहेबांना सारखं छळताय. आमच्या साहेबांना छळण्याऐवजी आमच्या समोर येऊन दाखवा, असे आव्हान आजींनी राणा दाम्पत्याला दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-
१७ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म पण बाळाचा बाप अवघ्या १२ वर्षांचा; काय आहे नेमकी घटना? जाणून घ्या..
झालं तेवढं खूप झालं, आता सौजन्याची ऐशीतैशी, शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा; काहीतरी मोठं घडणार
आलियाला सून बनवण्यासाठी कपूर कुटुंबाला साईन करावे लागले हे कॉन्ट्रॅक्ट, वाचा काय लिहीलंय त्यात?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now