गेल्या सात दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेला सत्तेचा सारीपाट अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांचा गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलात गेल्या काही दिवसांपासून मुक्कामाला आहेत.
शिंदे यांनी आज (दि.२८) रॅडिसन हॉटेलबाहेर येत पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्या गटाची भूमिका स्पष्ट केली. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. अजूनही शिंदे यांनी माघार घेतलेली नाहीये. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिवसेना गोत्यात आली आहे.
मात्र राज्यात विधान परिषदेचा निकाल लागला, आणि त्यानंतर एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार पक्ष कसे फोडू शकतात? या सवालाने राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच आता शिवसेना नेत्याने याबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे.
तसेच या बंडखोर आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे चार आमदार आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. यामुळे जळगावमध्ये देखील राजकरण तापलं आहे. असं असतानाच नुकतच जळगावमध्ये शिवसेनेकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जळगाव जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर काही आरोप केले आहेत. पाटील यांनी शिवसेनेमध्ये बंड पुकारले जाणार आहे, याची कल्पना 8 महिन्यांपूर्वीच दिली होती, असं सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
याबद्दल बोलताना संजय सावंत यांनी म्हंटलं आहे की, पाटील यांनी शिवसेनेमध्ये बंड पुकारले जाणार आहे, याची कल्पना 8 महिन्यांपूर्वीच दिली होती. एवढंच नाहीतर एक मोठा मंत्री हे फोडाफोडी करणार आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते, असा खुलासा सावंत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :-
तुम्ही तुमच्या व्हॉटसअप स्टेट्सला ठेऊ शकता आषाढी वारीचे ‘हे’ सुंदर स्टेट्स; लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः पडेल पाऊस
गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवत होता ‘हा’ सुपरस्टार, तिकडं मुलाने केलं करोडोंचे नुकसान
तुमच्या whatsapp ला आषाढी वारीचे ‘हे’ सुंदर स्टेट्स ठेवा; लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः होईल वर्षाव






