क्रिकेट आणि वाद यांचं जुनं नातं आहे. अलीकडेच भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याही एका नव्या वादात सापडला होता. टीम इंडियाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूवर दाऊद इब्राहिमचा दोषी रियाझ भाटीच्या पत्नीने बलात्काराचा आरोप केला होता. महिलेने तिच्या तक्रारीत हार्दिक पांड्यासोबत माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलचेही नाव घेतले होते.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासमोर हे नवीन आव्हान होतं. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी रियाझ भाटीच्या पत्नीने हार्दिक पांड्यासह हायप्रोफाइल लोकांनी तिच्यासोबत जबरदस्तीने सेक्स केल्याचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांसमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेत क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचेही नाव होते. रिपोर्ट्सनुसार, रियाझ भाटीच्या पत्नीने 24 सप्टेंबर रोजी मुंबईतील सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलवर अलीकडेच दाऊद इब्राहिमच्या पत्नीने बलात्काराचा आरोप केला होता. महिलेने तिच्या याचिकेत हार्दिक पांड्याचे नावही घेतले होते. महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिला खेळाडूसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
अमित मिश्रा
भारतीय लेगस्पिनर अमित मिश्रावर 2015 मध्ये त्याच्या महिला जोडीदाराचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर बंगळुरू पोलिसांनी अमित मिश्रालाही अटक केली. मात्र काही तासांनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. अमित मिश्राविरुद्ध महिलेचे शारीरिक शोषण आणि छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शोएब अख्तर
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर २००५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूनेच याचा खुलासा केला होता. लाइव्ह चॅटमध्ये त्याने हे सांगितलं होतं. पण हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
मखाया अँटनी
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मखाया अँटोनी याच्यावर 1999 च्या सुरुवातीला बलात्काराचा आरोप झाला होता. अँटोनीवर टॉयलेटमध्ये 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय क्रिकेटर दोषी मखाया ऍंटनी दोषी ठरला होताा. मात्र मखाया अँटोनीने आपले निर्दोषत्व सिद्ध केले आणि अखेर त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली.
रुबेल हुसेन
2015 मध्ये बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनवर त्याच्या मैत्रिणीने बलात्काराचा आरोप केला होता. महिलेने क्रिकेटरला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले, परंतु क्रिकेटरने नकार दिला. यानंतर पीडितेने रुबेलवर लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. ऑस्ट्रेलियात २०१५ च्या क्रिकेट विश्वचषकापूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
रायन हिंड्स
वेस्ट इंडिजचा अव्वल फलंदाज रायन हिंड्सवर 2012 मध्ये एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता, परंतु बार्बाडोस मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तथापि, हिंड्सला जामिनाची दुसरी अट म्हणून पासपोर्ट जप्त करण्यास सांगितले होते आणि दर आठवड्याला पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट करण्यास सांगितले होते.
ल्यूक पोमर्सबॅच
मे 2012 मध्ये, ऑस्ट्रेलियन खेळाडू ल्यूक पॉमर्सबेक याला नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये एका महिलेवर शारिरीक हल्ला आणि तिच्या नवऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पॉमर्सबॅकची जामिनावर सुटका करण्यात आली होती, परंतु त्याला त्याचा पासपोर्ट सरेंडर करावा लागला होता. प्रकरण न्यायालयाबाहेर निकाली निघाल्यानंतर त्याच्यावरील आरोप वगळण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
‘थॉर: लव्ह ऍन्ड थंडर’ चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई
आलिया भट्टला बाळ झाल्यानंतर रणवीर करणार नाही कसलीही तडजोड, केलं वेळापत्रक तयार
म्युच्युअल फंडात लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट केल्याचा फायदा, ‘या’ फंडांनी दिला तब्बल ४० ते ६६ टक्के परतावा
सचिन तेंडुलकर झाला सुर्यकुमार यादवचा फॅन, केलं तोंडभरून कौतुक, म्हणाला, रविवारी सु्र्य…