Share

अश्लील व्हिडिओ पाहून लहान मुलांचे भयानक कृत्य; ७ वर्षांच्या बहिणीवरच केला सामूहिक बलात्कार

गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. बलात्कराच्या वाढत्या घटनांमुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. असे असतानाच छत्तीसगडमधून एक अशी घटना समोर आली, जी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. (7 year old girl rape )

छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एका ७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबातील ६ अल्पवयीन मुलांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. चौकशीत या मुलांनी मोबाईलवर पाहून हे शिकल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुलांनी खेळाखेळातच ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घरातील ७ ते १३ वर्षे वयोगटातील ६ मुले मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून दीड महिन्यापासून मुलीवर सामूहिक बलात्कार करत होते. यादरम्यान मुलीची प्रकृती खालावली आणि तिला पोटात दुखू लागले. याची माहिती घरातील कोणालाच नव्हती.

यादरम्यान मुलीच्या मोठ्या भावाला कुटुंबातील भाऊ आणि शेजारील मुले त्याच्या बहिणीवर बलात्कार करत असल्याचा संशय आला. त्याने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी मुलांकडे विचारपूस केली असता त्यांनी बलात्काराची बाब मान्य केली.

त्यानंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आणि ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. या प्रकरणावर पोलिसांचे म्हणणे आहे की, सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना ७ ते १३ वयोगटातील मुलांनी केली आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून ते मुलीवर बलात्कार करत होते. मोबाईलमधील व्हिडिओ पाहून हे शिकल्याचे मुलांनी चौकशीत सांगितले. मुले मोबाईलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहत होती याचाही तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-
१९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी अबू बकरला अटक
शेतकऱ्याचा नाद नाय! ६ लाख खर्च करुन घराच्या छतावर लावले ३३ वर्षे जूने ट्रॅक्टर
पोस्टाने घरी आलेले पाकीट उघडले आणि महिलेची झाली फसवणूक, पैशांचा लोभ पडला महागात

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now