Share

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही काळी जादू, मांत्रिकांच्या नादात पुण्यातील ७ मोठे व्यवसायिक झाले उद्ध्वस्त

राज्यात आजही काही ठिकाणी काळ्या जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी पाहायला मिळतात. पण आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या काळ्या जादूच्या माध्यमातून अनेक व्यापारी फसवले गेले आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत एक वृत्त दिले आहे. (7 businessman lost their money because of mantrik)

पैशांचा पाऊस पाडतो, रक्कम दुप्पट करुन देतो, जमिनीत असणारी धनाची पेटी शोधून देतो, असे म्हणत अनेक मांत्रिकांनी व्यवसायिकांना लुटलं आहे. बाबांच्या या गोष्टींमुळे पुण्यासारख्या उच्चशिक्षित शहरातील ७ मोठे व्यवसायिकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे, तर काहींची मानसिकस्थिती बिघडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकांना, व्यवसायिकांना वेड्यात काढण्यासाठी मांत्रिक अनेक जादू करुन दाखवत असतात. काहीजण तर लिंबूही हवेत उडवून दाखवत असतात. एका बाबाने तर आपल्याकडे असलेल्या हड्डीत जीन असल्याचा दावा केला होता. ही साधी हड्डी नसते, तर तिच्याजवळ नेलेलं कुलूपही ती तोडते. काळ्या जादूच्या दुनियेत या हड्डीला दीडफुट्या हड्डी बोलतात.

तसेच नागमणीच्या नावाखालीही मांत्रिक लोकांना वेड्यात काढतात. मांत्रिकांकडे काही नागमणी असेही असतात, जे पाण्यात टाकताच तडफड सुरु करतात. असे म्हणतात हा नागमणी जर घरात ठेवला तर कुटुंबाची भरभराट होते. त्यामुळे काही मांत्रिक हा नागमणी कोटींच्या घरात विकतात.

काळ्या जादूच्या दुनियेत हळदीलाही मोठी मागणी आहे. आपल्याकडे असलेल्या हळदीचे चांगले गुणधर्म असेल तरी काळ्या जादूच्या दुनियेत या हळदीला कोटींच्या घरात मागणी आहे. ही हळद अशी असते की ते बंद कुलूप लगेच उघडते. तसेच लोखंडी वस्तूही या हळदीसमोर सहज वाकतात.

या सर्व गोष्टींचे चमत्कार दाखवून मांत्रिक लोकांना फसवताना दिसतात. या चमत्काराचा पर्दाफाश करण्यासाठी फक्त सुक्ष्म निरीक्षणाची गरज असते. पण तरीही काही व्यवसायिक मांत्रिकांच्या जाळ्यात अडकतात. झटपट पैसा कमवण्याच्या नादात अनेकजण या गोष्टींना बळी पडत असल्याचे लक्षात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या पवारांना आस्मान दाखवण्याची भाजपची तयारी; फडणवीसांनी सांगीतला पुर्ण प्लॅन
केतकी चितळेच्या वकीलांनी राज्य सरकारवर केले गंभीर आरोप; राज्यपालांची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी
“इथे नाव कमवायला खूप येतात पण अशोकमामा कमवण्यासाठी नाही तर भरभरून देण्यासाठी आले”

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now