Share

‘‘महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या ५५ वर्षांत मला एका दिवसासाठीही रजेवर पाठवलेले नाही यासाठी मी त्यांचा ऋणी’’

sharad pawar

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भारतातील अग्रगण्य राजकीय नेत्यांमध्ये गणना होते. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या अनुकरणीय अशा कारकिर्दीने स्वातंत्र्योत्तर भारतातील चार दशकांचा कालखंड पाहिला. तसेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २००४ साली सत्ता ग्रहण केली.

पहिल्यांदा शरद पवार आमदार म्हणून १९६७ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले होते. तेव्हापासून ते सातत्याने विधानसभा, विधान परिषद, लोकसभा सदस्य राहिले. सध्या ते राज्यसभा सभागृहाचे सदस्य आहेत. विशेष बाब म्हणजे या काळात त्यांच्या संसदीय कारकिर्दीत एकाही दिवस खंड पडला नाही.

तसेच 22 फेब्रुवारी 1967 रोजी शरद पवारांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत शरद पवार सलग कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. आनंदाची बाब म्हणजे रविवारी शरद पवार यांच्या संसदीय कार्याला ५५ वर्षे पूर्ण होत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री बनूनही त्यांनी कारभार सांभाळला आहे. तसेच रविवारी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२१ डॉ. रेणू स्वरूप यांना प्रदान करण्यात आला.

दरम्यान, शरद पवारांच्या हस्ते डॉ. रेणू स्वरूप यांना ५ लाख रुपये आणि मानचिन्ह देण्यात आले. डॉ. रेणू स्वरूप यांच्या कार्याची ओळख म्हणजे केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या त्या माजी सचिवदेखील होत्या. डॉ. स्वरुप यांनी केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागामध्ये संशोधनाचे कार्य केले आहे.

तर दुसरीकडे या कार्यक्रमावेळी निवेदक अंबरीष मिश्र यांनी शरद पवार यांच्या संसदीय कार्याला रविवारी ५५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर याबाबत बोलताना शरद पवारांनी जनतेचे आभार मानले. ‘महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या ५५ वर्षांत मला एका दिवसासाठीही रजेवर पाठवलेले नाही यासाठी मी त्यांचा ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
बहिण मालविकाच्या पराभवानंतर सोनू सूदचं पहिलं ट्विट वाऱ्यागत व्हायरल; बड्या – बड्या नेत्यांच्या भुवया उंचवल्या
तिसरे अपत्य असल्यामुळे महिलेला गमवावी लागली सरकारी नोकरी, न्यायालयाने दिला मोठा निर्णय
प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता तीन राज्यांत ‘द काश्मिर फाईल्स’ करमुक्त, चित्रपटाने केली छप्परफाड कमाई
आमदार झाल्यानंतर सर्वात आधी विरोधी पक्षातील उमेदवाराचे घेतले आशिर्वाद, होतोय कौतुकाचा वर्षाव

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now