शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. (50 mla expenses 3 thousand crore)
सर्व आमदार सध्या आसामच्या गुवाहटीत आहे. त्या आमदारांबद्दल उलटसुलट चर्चाही सुरु आहे. हॉटेलच्या भाड्यामध्ये ६५ लाख रुपये खर्च झाल्याचे म्हटले जात आहे. हॉटेलमधील रुम सात दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहे. तसेच लाखो रुपये या दिवसांमध्ये खर्च केले जात आहे,अशी चर्चा सुरु आहे.
तसेच आसाम आणि गुजरातचे सरकार बंडखोर आमदारांना कशी मदत करत आहे, त्याबाबतही चर्चा होत आहे. अशात बंडखोर आमदारांना पैसे दिले गेल्याची चर्चा आहे. प्रत्येक आमदाराला ५० कोटी दिले गेले असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.
सध्या ५० पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदेंबरोबर आहे. त्यामध्ये ४० पेक्षा जास्त आमदार शिवसेनेचे आहे, तर १० आमदार अपक्ष आहे. या प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये देण्यात येणार आहे, असे म्हटले जात आहे. याचा हिशोब केला तर तो आकडा २५०० कोटींपर्यंत जात आहे.
तसेच फाईव्ह स्टार हॉटेल्स, जेवणाचा खर्च, वाहतूक व्यवस्था, विमानाचा खर्च या सर्व गोष्टी मिळून तीन हजार कोटींपर्यंत खर्च जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत बोलताना तापसे म्हणाले की, आयकर विभागाने या सर्व खर्चांची तपासणी केली पाहिजे. ईडीने छापे टाकल्यास काळ्या पैशांचे स्त्रोत उघडकीस येईल.
दरम्यान, महाविकास आघाडीला वाचवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने उपाध्यक्षांकडे केली आहे. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
“शिंदेसाहेब तुम्ही निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही”
शिवसेनेसाठी राष्ट्रवादी रणांगणात उतरली; आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हाॅटेलबाहेर..
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर राष्ट्रवादीची नजर; गुवाहाटीच्या हॉटेलजवळून टेहळणी