राज्यात राजकीय वातावरण तापलेल असतानाच आता होळीनंतर राजकीय धुळवडीला सुरूवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच भाजपा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात सत्तेच्या घडामोडी घडतायेत का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे सरकारमधील २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं दानवे यांनी म्हंटलं आहे.
दानवे यांच्या नंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील खळबळजनक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘आम्ही असं बोललो तर भाजपाचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच असा दावा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. दानवे यांनी केलेल्या दाव्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, ‘दानवे यांना जितके मी ओळखतो, तितके ते भांग पीत नाहीत असं मला माहित आहे किंवा दुसरी कोणती नशा करत नाहीत. दानवे यांना कदाचित १२५ बोलायचं असेल स्लीप आँफ टंग झाली असेल, असा टोमणा त्यांनी मारला.
तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, संपर्कात असतील तर घ्या ना, थांबला कशाला होळी संपली आहे. कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान आता पुन्हा एकदा दानवे विरुद्ध राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध होणार असल्याचे चित्र दिसतं आहे.
दरम्यान, दानवे यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर देखील तिखट शब्दात टीका केली होती. ‘ज्या दिवशी शिवसेनेनं आम्हाला सोडलं आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरवं पांघरून घेतलंय आणि ते हिरव्याचं समर्थन करतात, अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
युपीत राजकीय उलथापालथ! निवडणूक सपा आघाडीमधून लढविली; पण योगींच्या मंत्रिमंडळात ‘हा’ बडा नेता होणार मंत्री
‘द कश्मीर फाइल्स’मुळे पुन्हा वाद उफाळण्याची भीती; काश्मिरी पंडितांनी मांडलं रोखठोक मत
रंगाचा बेरंग ! सोसायटीच्या धुलिवंदनात बेधुंद होऊन नाचला, घरी पोहोचल्याच्या थोड्याच वेळात तरुणाचा मृत्यू
माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मोठा बदल, ‘या’ दिग्गज अभिनेत्याने अचानक सोडली मालिका