काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. असे असतानाच आता नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढाळी-नागपूर मार्गावर शिवा फाट्या जवळ एका कारचा भीषण अपघात झाला आहे. (5 month old baby car accident)
या कार अपघातात तीन जणांचा मृत्यु झाला आहे. कारचालक वडिलासह ५ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यु झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण उपचारादरम्यान महिलेचा मृत्यु झाला आहे.
कोंढाळा पोलिस ठाण्याअंतर्गत अमरावती-नागपूर महामार्गावर शिवा फाट्याजवळ आज दुपारी हा अपघात घडला आहे. या अपघात मृत्यु झालेल्या व्यक्तींची नावे रोशन तागडे (२५), राम तागडे (५ महिने) आणि आचल तागडे (२३) अशी आहे. तर या अपघातातून जोया मेश्राम (८) ही बचावली आहे.
रोशन तागडे आणि मुलगा राम तागडे यांचा अपघातात जागीच मृत्यु झाला आहे. तर आचल यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. आईवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अचानक आईची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे उपचारादरम्यान तिचीही प्राणज्योत मावळली आहे.
रोशन तागडे हे आपल्या कुटुंबासह कोंढाळी येथे लग्नाला गेले होते. लग्न सोहळा आटोपून नागपूरला परत येत होते. अमरावती-नागपूर महामार्गावर शिवा फाट्याजवळ पोहचले होते. अशात अचानक समोर आलेला ट्रेलर थांबवण्यासाठी डावीकडे वळवला. त्यामुळे भरधाव कारने ट्रेलरला जबर धडक दिली. या भीषण अपघातात रोशन ताडगे आणि त्यांचा मुलगा रामचा जागीच मृत्यु झाला.
या अपघातात पत्नी आणि एक ८ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण गंभीर जखमी असल्यामुळे आईचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या अपघातात संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पठ्याने स्कुटर विकत घ्यायला आणली पोतंभर नाणी, शोरूम कर्मचाऱ्यांची अशी होती रिऍक्शन
पुरुषांच्या शारीरीक कमजोरीवर मात करण्यासाठी ‘हा’ मसाला असतो खुपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे
धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाशी भिडली आई, १२ तास ठेवलं पकडून अन्…