Share

देशात खळबळ! एकाच ट्रकमध्ये आढळले तब्बल 46 मृतदेह, चौकशीत झाला हैराण करणारा खुलासा

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील सॅन अँटोनियो शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये 46 जणांचे मृतदेह आढळले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रॅक्टर-ट्रेलरमधून सुमारे 46 लोकांचे मृतदेह सापडले आहेत.

कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी सांगितले की, टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये किमान 46 लोक मृतावस्थेत आढळले आहेत. या घटनेने पुर्ण शहरात खळबळ माजली आहे. सॅन अँटोनियोमधील KSAT टेलिव्हिजनने पोलिस सूत्रांचा हवाला देऊन ट्रकमध्ये 46 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे.

KSAT ने सांगितले की, ट्रक शहराच्या दक्षिणेकडील एका दुर्गम भागात, रेल्वे रुळांच्या शेजारी सापडला. KSAT टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, सॅन अँटोनियो, टेक्सास येथे ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये किमान 46 लोक मृतावस्थेत आढळले. तसेच इतर अनेक लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलिसांच्या अनेक गाड्या आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचे हे प्रकरण असल्याचे मानले जात आहे. नगर परिषदेच्या प्रमुख अड्रियाना रोचा गार्सिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये ज्या लोकांचे मृतदेह सापडले ते सर्व स्थलांतरित आहेत.

त्यांचा मृत्यु कसा झाला? याबाबत सध्या तरी खुलासा झालेला नाही. सॅन अँटोनियो पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका KSAT रिपोर्टरने ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये मोठ्या ट्रकभोवती पोलिसांची वाहने आणि रुग्णवाहिका दिसत आहेत. मेक्सिकन सीमेपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या सॅन अँटोनियोमध्ये सोमवारी  39.4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते.

सॅन अँटोनियो अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 16 जणांना उष्माघाताची तक्रार आहे. सध्या हे सर्वजण बंद ट्रकच्या आत बसले होते आणि कडक उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि अनेकांना जीव गमवावा लागल्याचे समजते. याप्रकरणी अनेकांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
‘एकनाथ शिंदेंना काळी जादू येते, त्यांनी बंडखोर आमदारांवर जादूटोना केलाय’
कट्टर समर्थकानेच राठोडांचा बुरखा फाडला, पुजा चव्हाणला राठोडांनीच मारले; पुराव्यादाखल ५२ मिनीटांची कॉल रेकॉर्डींग…
राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिक झाले आक्रमक
…म्हणून दोन वेळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देता देता थांबले, हैराण करणारी माहिती आली समोर

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now