Share

४ वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला, अंगाचे तोडले लचके; व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक ४ वर्षाची चिमुरडी आपल्याला खेळत असताना दिसते. अचानक चार ते पाच भटकी कुत्री तिथे येतात आणि त्या चिमुरडीचा पाठलाग करू लागतात. या व्हिडिओमध्ये चिमुरडीचा पाठलाग करताना चार ते पाच कुत्रे दिसत आहेत.

त्यांनतर ही भटकी कुत्री त्या चिमुरडीला खाली पाडतात आणि त्या लहान मुलीच्या अंगाचे लचके तोडण्यास सुरूवात करतात. आपल्या अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ आहे. या धक्कादायक घटनेत चिमुरडीच्या अंगावर अनेक जखमा झाल्या आहेत. भटक्या कुत्र्यांचा हल्ला इतका भयानक होता की, या हल्ल्यामुळे चिमुरडी पूर्णपणे घाबरली आहे.

भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये या लहान मुलीच्या नाक, कान, डोक्यावर आणि हातावरही जखमी झाल्या आहेत. या हल्ल्यामुळे चिमुरडीच्या चेहऱ्यावर, पोटावर आणि खांद्यावरही भटक्या कुत्र्यांच्या दातांचे व्रण आढळून आले आहेत. सध्या या चिमुरडीवर भोपाळमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

https://twitter.com/Skbhargav71/status/1477537357184188416?s=20

ही घटना शनिवारी सायंकाळी भोपाळमधील बागसेवानिया येथील अंजली विहार फेझ-२ या ठिकाणी घडली. भटक्या कुत्र्यांनी या चिमुरडीवर केलेला हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या चिमुरडीचे वडील मजुरीचे काम करतात. आपल्या कामाच्या ठिकाणी ते त्यांच्या मुलीला घेऊन गेले होते. तिथे त्यांची मुलगी खेळत असताना अचानक तिच्यावर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

त्या हल्ल्यात मुलगी घाबरून खाली पडली. त्यानंतर भटक्या कुत्र्यांनी त्या लहान मुलीच्या अंगाचे लचके तोडण्यास सुरूवात केली. तसेच अनेक ठिकाणी चावाही घेतला. त्याच वेळी एक व्यक्ती घटनास्थळी धावून आला आणि त्याने त्या भटक्या कुत्र्यांना हटकले. त्या व्यक्तीमुळे हल्ला करणारे भटके कुत्रे पळून गेले. अशाच जखमी अवस्थेत त्या चिमुरडीला जवळच्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

भोपाळमध्ये भटक्या कुत्र्यांकडून हल्ला होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याआधीही कोलार, तुलसी नगर, अयोध्या नगर, करोंद यासारख्या भागात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक नागरिकदेखील त्रस्त आहेत. पण तक्रारीनंतरही स्थानिक प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या संपूर्ण घटनेची दखल मध्य प्रदेशच्या मानव अधिकार आयोगाने घेतली आहे. या घटनेवर मानवाधिकार आयोगाने भोपाळ महापालिका आयुक्त आणि भोपाळ जिल्हा प्रशासनाच्या आयुक्तांकडून तात्काळ उत्तर मागितले आहे. तसेच घटनेबाबतची सखोल माहिती देण्याचे आदेश मानव अधिकार आयोगाने दिले आहेत. भोपाळमध्ये भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाखो रूपये खर्च करून देखील भटक्या कुत्र्यांची दहशत संपत नसल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
जमीन वाटून देत नाही म्हणून मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव, बापाचीही बोटे छाटली; पुण्यातील घटना
VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला
मुस्लिम महीलांचे अश्लील फोटो पोस्ट करणाऱ्या ॲप विरोधात शिवसेना आक्रमक; केली ‘ही’ कारवाई

इतर

Join WhatsApp

Join Now