Homeताज्या बातम्यामुस्लिम महीलांचे अश्लील फोटो पोस्ट करणाऱ्या ॲप विरोधात शिवसेना आक्रमक; केली ‘ही’...

मुस्लिम महीलांचे अश्लील फोटो पोस्ट करणाऱ्या ॲप विरोधात शिवसेना आक्रमक; केली ‘ही’ कारवाई

गिटहब ऍपला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. या ऍपवर सातत्याने टीका होत आहे. कारण या ऍपवर अनेक प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आली असून त्यावर अपमानास्पद टिप्पणी केली जात असल्याचा आरोप आहे. या फोटोंसमोर त्यांची किंमत लिहीली असून आक्षेपार्ह मजकूरही लिहीण्यात आला आहे.

या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. गिटहब एक होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे जिथे ओपन सोर्स कोड संग्रहित केला जातो. पण आता गिटहब आणि त्यावर तयार होत असलेल्या अशा गोष्टींमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच त्यामुळे हे ऍप बॅन करण्याची मागणी केली जात आहे.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शनिवारी हा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, होस्टिंग प्लॅटफॉर्म गिटहब वापरून शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो ऍपवर अपलोड करण्यात आले आहेत. चतुर्वेदी म्हणाल्या की, आपण मुंबई पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केली असून, दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी ट्विट केले की, मी मुंबईचे पोलीस आयुक्त रश्मी करंदीकर यांच्याशी बोलले आहे. ते याचा तपास करणार आहे. तसेच मी मध्यस्थी करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशीही बोलले आहे. आशा आहे की अशा चुकीच्या आणि अल्ट्स साइट्समागे असणारे पकडले जातील.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव जी यांना अनेक वेळा ‘सुली डील्स’ सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना लक्ष्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, मुंबई पोलिसांनी म्हटले की, या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई सायबर पोलिसांनी आक्षेपार्ह कंटेंटची चौकशी सुरू केली आहे.

ऍपमध्ये नाव असलेल्या महिलांपैकी एक असलेल्या एका पत्रकारा महिलेने सांगितले की, मुस्लिम महिलांनी नवीन वर्षाची सुरुवात भीती आणि द्वेषाच्या भावनांनी केली आहे. गेल्या वर्षी, ‘सुली डील्स’ वादात दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले होते, ज्यामध्ये मुस्लिम महिलांच्या फोटोंचा गैरवापर करण्यात आला होता, परंतु दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

महत्वाच्या बातम्या-
साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर का आली सर्वांपासून तोंड लपवायची वेळ? जाणून घ्या कारण
‘शमिताला वोट करा यावेळी ती जिंकलीच पाहिजे’, शिल्पा शेट्टीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
रोहनमसोबतच्या ब्रेकअपबाबत सुष्मिताचा मोठा खुलासा, म्हणाली, ‘मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले’