Share

निधनानंतरही हेळसांडच! 4 महिलांनी 5 KM खांद्यावर नेला वृद्धेचा मृतदेह; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पहा

crime

सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात तर काही समाज प्रबोधन करणारे असतात मात्र काही व्हिडिओ आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतं आहे.

हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल. अलीकडे माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं, अशा घटनांचं प्रमाण वाढू लागलं आहे. अशातच एक व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे. 4 महिला आपल्या खांद्यावर एका वृद्ध महिलेचा मृतदेह नेत असतानाचा हा व्हिडिओ आहे.

तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील रायपूर करचुलियन गावातील आहे. 80 वर्षीय वृद्ध महिलेची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली होती.

https://twitter.com/ManojSharmaBpl/status/1509013793216421894?s=20&t=L3ExaBeECIM_yEVD2rLwJQ

मात्र धक्कादायक बाब म्हणजे अनेक तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका न आल्याने कुटुंबीयांनी महिलेला खाटेसह उचलून सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. त्यानंतरही कुटुंबीयांना शववाहिकाही मिळाली नाही. शेवटी या महिलांनी खांद्यावर मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला.

शेवटी 5 किमी प्रवास करत घरातील 4 महिला आणि एका मुलीने मिळून खांद्यावरच वृद्ध महिलेचा मृतदेह उचलून घरी नेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आपल्या चिमुकलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापानं १० किलोमीटरची पायपीट केली होती.

दरम्यान, आता पुन्हा एकदा असाच प्रकार आता समोर आल असून त्यावरून सरकारी यंत्रणांच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. सध्या हे व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं असून व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका देखील चुकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आता हद्दच झाली! कपड्यांशिवाय अंगावर फक्त फोटो चिटकवून उर्फी जावेदने केला डान्स, पहा व्हिडीओ
गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार?; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे विधान
कोरोनाचा हाहाकार! वुहाननंतर शांघाईमध्ये सर्वात मोठे लॉकडाऊन, माणसांसोबत प्राण्यांवरही लावले निर्बंध
भर कार्यक्रमात चोरट्याने केला शिवसेना नेत्याचा खिसा रिकामा, व्हिडिओ झाला व्हायरल

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now