ब्रेकिंग! उदयनराजेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, सदावर्तेंचा मुक्काम पोलिस कोठडीतच

ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. सकाळी सकाळी सातारा पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं होतं.

जेव्हा त्यांना कोठडीतून कोर्टात नेलं जात होतं त्यावेळी सदावर्ते यांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरूवात केली. वंदे मातरम…मेरी आवाज हिंदुस्थान की आवाज है.. अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या. हात वर करून त्यांनी कोर्टाच्या बाहेर मिडीयासमोर घोषणा दिल्या.

घोषणा देताना त्यांच्या चेहऱ्यावर थोडीही भिती दिसत नव्हती. पण जेव्हा सदावर्ते घोषणा देत होते तेव्हा पोलिसांनी क्षणभरही न थांबता त्यांना थेट गाडीत बसवले आणि कोर्टात हजर केले. सातारा पोलिसांनी त्यांना २०२० सालच्या प्रकरणात अटक केली आहे. त्यांनी त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते.

त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यांना कोर्टात सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टाने त्यांना पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. छत्रपतींच्या वारसाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. त्यांना कोर्टात हजर केले असता सहावे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

यावेळी कोर्टात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता. युक्तिवाद संपल्यानंतर न्यायाधीशांनी युक्तिवादाचे अवलोकन करून हा निर्णय दिला आहे. सरकार पक्षाने १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. विविध मुद्द्यांचा तपास करण्यासाठी ही मागणी त्यांनी केली होती. यावेळी तपास अधिकारी आणि सरकार पक्षाचे दोन वकील असे तिघेजण बोलत होते.

सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाने सर्व मुद्दे खोडून काढले. दोन्ही पक्षांमध्ये खुप वाद झाला. यावेळी बचाव पक्षाने उदयनराजे यांचा पराभव का झाला असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सरकार पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर बचाव पक्षाने सपशेल माफी मागितली. माफीनाम्यानंतर सरकार पक्षाने सुमोटो गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या
सलग पाचव्या सामन्यात पराभव झाल्यानंतर रोहित शर्माच्या अडचणीत वाढ, कर्णधारपद जाणार?
रणबीर-आलियाच्या लग्नामुळे त्रासले शेजारी, केली पोलिसांत तक्रार; म्हणाले, तीन चार दिवसांपासून..
आलियाच्या हातातील खास हिऱ्याची अंगठी आणि या गोष्टीने चाहत्यांचे वेधले लक्ष, पहा फोटो
रणबीर-आलियाच्या लग्नातील करिना-जेहच्या फोटोने जिंकली चाहत्यांची मनं, बघताच क्षणी पडताल प्रेमात