पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसच्या (congress) अध्यक्षा सोनिया गांधी (soniya gandhi) यांनी पक्षातील काही नेत्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधींनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, या राज्यांमधील संघटनेच्या पुनर्रचनेसाठी पीसीसी अध्यक्षांना पद सोडण्यास सांगण्यात आले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाबाबत पक्षप्रमुखांनी रविवारी बैठक बोलावली होती. तेव्हापासून सातत्याने कारवाईचा कालावधी सुरू झाला.
त्यामुळे आता पराभूत झालेल्या राज्यांतील काँग्रेस समित्यांच्या अध्यक्षांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशानंतर काही वेळातच उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोंदियाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा पत्र सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
अजय कुमार लल्लू यांनीही उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून लल्लू म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी यूपी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वोच्च नेतृत्वाचे आभार. एक कार्यकर्ता म्हणून मी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत राहणार आहे. तसेच
काँग्रेसशासित पंजाब या राज्यात मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनाही आपली जागा वाचवता आली नाही. त्यामुळे सिद्धू यांनीही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या उर्वरित राज्यांमध्येही काँग्रेसचा दारुण पराभव झाला.
राजधानी दिल्लीत सुमारे पाच तास चाललेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, काँग्रेस पक्षाची प्रगती रोखण्यासाठी गांधी घराणे जबाबदार असेल, तर ते त्याग करण्यास तयार आहेत. पण पक्षाने या गोष्टीला नकार दिला आहे.
११७ सदस्यीय पंजाब विधानसभेत काँग्रेसला केवळ १८ जागा मिळाल्या आहेत. येथे आम आदमी पक्षासमोर पक्षाची सत्ता गेली. दुसरीकडे, पक्षाला ७० जागांपैकी उत्तराखंडमध्ये १९ जागा आणि उत्तर प्रदेशात ४०३ जागांपैकी केवळ २ जागा मिळाल्या. तर मणिपूरमध्ये ५ आणि गोव्यात काँग्रेसला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले.
महत्वाच्या बातम्या
काँग्रेसला मोठा धक्का! विधानसभा निवडणूकांच्या पराभवानंतर चार बड्या नेत्यांनी दिला राजीनामा
पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ; सोनिया गांधींनी घेतले ‘या’ बड्या नेत्यांचे राजीनामे
‘तुम्हाला दु:ख जर समजत नसेल तर तुम्ही या देशाचे रहिवासी नाही’, काश्मिर फाईल्स पाहिल्यानंतर मुकेश खन्ना संतापले
कॉमेडियन कृष्णाच्या बायकोने केली बोल्डनेसची हद्दपार; बिकीनीच्या ‘त्या’ व्हिडिओने चाहते झाले घामाघूम