सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातले काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे पक्षांचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. त्यामधले काही व्हिडिओ हे धक्का देणारे असतात, तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. (34 birds die after crash bulding)
आताही असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही पक्षी एका इमारतीला धडकून खाली पडले आहे. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. इमारतीला काचा असल्यामुळे पक्ष्यांना ते आकाश वाटले असावे, त्यामुळे त्या इमारतीला धडकले असे म्हटले जात आहे.
संबंधित घटना ही गुजरातमध्ये घडली आहे. इमारतीच्या काचा पक्षांसाठी किती धोकादायक ठरु शकतात हे यातून दिसून आले आहे. ही इमारत गुजरातच्या सूरतमधली आहे. इमारतीच्या भिंतींना शोसाठी काचा लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे आकाशाचे प्रतिबिंब त्यामध्ये दिसत होते. या काचांमुळेच ३४ पक्ष्यांचा मृत्यु झाला आहे.
सूरत:
बिल्डिंग के शीशे से टकराने से 34 पक्षियों की मौत?
जिला बैंक की बिल्डिग के CCTV में एक साथ 34 पक्षी ऊपर से गिरते देखे।
बताया जा रहा है की बिल्डिंग पर शीशे लगे थे,जिस में आसमान का रिफ्लेक्शन दिख रहा था।आसमान समझकर शीशे से तेज रफ्तार तो नही टकराये पक्षी!@kirteshpatel305 pic.twitter.com/0UAVP2l5VR
— Janak Dave (@dave_janak) February 4, 2022
इमारतीवर काचा लावण्यात आलेल्या होत्या. या काचांमुळे आकाशाचे रिफ्लेक्शन पडत होते. हे आकाश आहे असे समजून पक्षी तिथून जात होते. पण तिथे जवळ जाताच ते सर्वच्या सर्व पक्षी काचांना धडकले आणि जमिनीवर पडले. काचेच्या धडकेमुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.
सूरत नागरिक बँकेच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये ३४ पक्षी एकाचवेळी खाली पडताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की ज्या इमारतीला पक्षी धडकले त्या इमारतीवर काचा लावलेल्या होत्या. या काचांमुळेच त्यांचा मृत्यु झाला असल्याचे म्हटले जात आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत १३ हजारपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. तसेच यावर काही लोकांनी कमेंटही केल्या आहे. एकाने असे म्हटले आहे की काचा धडकून पक्षी मरुच शकत नाही. त्यांना नक्कीच एखादा तारेचा इलेट्रीक शॉक लागला असावा. तर एकाने म्हटले की, पक्षी असेच मरत राहिले तर पुढच्या पिढीला पक्षीच दिसणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
आता तर हद्दच झाली! चक्क हौसींग सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; पहा व्हिडिओ
मंत्री पुढे.. समर्थक मागे! उमेदवारी अर्ज भरायला झाला उशीर, वकिलांसह मंत्री महोदय सुटले पळत
..त्यावेळी दिग्दर्शकांनी मला गर्भनिरोधक गोळी खरेदी करायला सांगितली होती, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा