जम्मू-काश्मीर- राजस्थान राष्ट्रीय मार्गावर असलेल्या नौशहरा पन्नुआ शहरातील एचडीएफसी बँकेतून तीन दरोडेखोरांनी ३० लाखांची रोकड लुटली आहे. तसेच चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाची डबल बॅरल रायफल, महिला कॅशियरची सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून नेला आहे. (30 lakh robbery in hdfc bank)
यावेळी चोरट्यांनी फक्त पैसे आणि चैनच नाही, तर बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला. याप्रकरणी सरहाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दरोड्याची घटना पंजाबमधील तरनतारण जिल्ह्यातील सरहाली पोलिस स्टेशन परीसरात घडली आहे.
एचडीएफसी बँकेत तीन बदमाश घुसले. एका बदमाशाने बँकेच्या गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात पिस्तुलाचे बट मारले आणि १२ बोअरची परवाना असलेली रायफल हिसकावून घेतली. दुसरीकडे, दुसऱ्या दरोडेखोराने बँकेचे शाखा व्यवस्थापक आशिष अरोरा यांना लक्ष्य केले, तर तिसऱ्या दरोडेखोराने केबिनमध्ये जाऊन महिला कॅशियरकडे पिस्तूल दाखवून ३० लाखांची रक्कम लुटली.
तेथून निघताना चोरट्यांनी महिला कॅशियरच्या गळ्यातील सोनसाखळी, एक मोबाईल आणि बँक मॅनेजरचा मोबाईल हिसकावून नेला. या तिन्ही दरोडेखोरांनी बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही नेला. दरोडेखोरांनी अवघ्या ४५ सेकंदात हा गुन्हा केला.
हे हल्लेखोर दोन दुचाकींवर आले होते. घटनेची माहिती मिळताच एसएसपी गुलनीत सिंह खुराना घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची नाकाबंदी केली, मात्र दरोडेखोरांचा पत्ता लागला नाही. दुसरीकडे एसएसपी गुलनीत सिंग खुराना यांनी सांगितले की, अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरनतारण जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर गेल्या दोन महिन्यांत बँकेवर दरोड्याची ही तिसरी मोठी घटना आहे. एचडीएफसी बँकेसमोर एक घर असून, घरफोडीची घटना त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या संपूर्ण घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
बिनबुडाचे आरोप करुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएलची बदनाम करु नको; आफ्रिदी फॉकनरवर संतापला
संजय राऊतांनी दिले किरीट सोमय्यांना आव्हान; म्हणाले, ‘या’ तीन प्रश्नांची उत्तरे द्या
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यामुळे आईने मुलालाच संपवले; औरंगाबादची भयानक घटना