Share

भयानक! शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात, २०० फुट दरीत कोसळली मोटरसायकल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फक्त राज्यातच नाही, तर देशभरात उत्सहाचे वातावरण आहे. राज्यातील अनेक ठिकाणाहून शिवप्रेमी शिवज्योतसाठी रायगडाच्या दिशेने वाटलाच करत आहे. असे असतानाच आता एक भयानक घटना समोर आली आहे. (3 youngerster accident bhor)

भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडाच्या दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटरसायकल २०० फुट दरीत कोसळली आहे. ही घटना सकाळी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

हा अपघात घडला तेव्हा तीन जण एकाच मोटरसायकलवर होते. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडला आहे. तिघांनाही महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. महाराष्ट्रात शिवजयंती निमित्त उत्सहाचे वातावरण आहे, पण अशा घटनांमुळे दु:ख व्यक्त केले जात आहे.

शिवजयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. तसेच प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिवजंयती साध्यापणाने साजरी करण्यात आली होती. पण यावेळी अधिक उत्साहाने शिवजयंती साजरी केली जात आहे.

शिवजयंती साजरी करण्यासाठी भोर येथून तीन तरुण अधिक उत्साहाने एकाच मोटरसायकलवरुन निघाले होते. त्यावेळी घाटाचा अंदाज न आल्याने तिघेही दरीत कोसळले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात एकाला किरकोळ लागल्यामुळे त्याच्यावर उपचार करुन त्याला सोडून देण्यात आले आहे. तर उरलेल्या दोन जणांना तिथल्या ग्रामीण भागातील रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आलेले आहे. केतन देसाई (२३), प्रथमेश गरुड (२५), किरण सूर्यवंशी (२०) असे या तिन्ही तरुणांचे नावे आहे.

हे तिन्ही तरुण भोंगवली तालुक्यातील भोरचे रहिवासी आहे. त्यापैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर एकावर प्रथोमचार करुन त्याला सोडून देण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले आहे.

महत्वाच्या बातम्या-
कॅनडात स्वास्तिकला बंदी घातल्यामुळे भारतीयांनी रस्त्यावर उतरून केले आंदोलन, वाचा का घातली बंदी..
“शाळेत जय माता दीचा दुपट्टाही नाही चालणार आणि..”, कंगना राणावतने पुन्हा हिजाब वादावर दिली प्रतिक्रिया
परकरच्या नाडीने आईनेच आवळला पोटच्या मुलाचा गळा, पोलिस तपासात धक्कादायक कारण आले समोर

राज्य

Join WhatsApp

Join Now