आजपर्यंत अनेक रांगोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने साकारणारे देवरुखमधील रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी सर्वात छोटी रांगोळी काढून विश्वविक्रम केला आहे. त्यांनी ३ सेंटीमीटर एवढ्या लहान चौकोनात शिवप्रतिमाँ साकारून हा विक्रम केला आहे.
विलास रहाटे मूळचे चिपळूणचे आहेत, मात्र शिक्षणानिमित्त ते देवरुखमध्ये आता स्थायिक झालेले आहे. विलास व्यक्तीचित्रात्मक रांगोळी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतपर्यंत अनेक व्यक्तिरेखा आपल्या रंगोळीतून तयार काढल्या आहे.
आता विलास रहाटे यांनी सर्वात छोटी रांगोळी काढून विश्वविक्रम केला आहे. त्यांनी ३ सेंटीमीटरच्या चौकोनात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा काढली आहे. त्यांनी ही प्रतिमा फक्त ४२ आणि ३७ सेकंदात साकारली आहे. यासाठी त्यांना ६ ग्रॅम रांगोळी लागली आहे.
विलास रहाटे यांच्या आधी ५ सेंटीमीटर रांगोळीचा विश्वविक्रम होता. विलास रहाटे यांनी हा विक्रम मोडून आता ३ सेंटीमीटरमध्ये शिवप्रतिमा काढून नवीन विश्वविक्रम केला आहे.
विलास रहाटे यांच्या या विक्रमाची नोंद आयईए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे, त्यामुळे लवकरच त्यांना आयईए बुककडून सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुढे विलास रहाटे यांना पाण्यावर तरंगणारी रांगोळी काढणे आणि पाच रुपयांच्या कॉईनच्या आकारात रांगोळी काढायची आहे. हे त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझी स्वतःच विक्रम मोडण्याची इच्छा आहे, असे विलास रहाटे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
छत्रपती शिवाजी महाराजांकडे ७ घोडे होते, त्यांची नावे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या..
‘या’ नियमाचे उल्लंघन केल्यास शिवाजी महाराज स्वता:च्याच मावळ्यांना द्यायचे शिक्षा
बेव सिरीजच्या नावाखाली बटल्यांनी मॉडेलसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य; मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोमय्यांना आज फक्त ड्रामेबाजी करायची होती ती शिवसैनिकांनी हाणून पाडली, कोर्लई गावच्या सरपंचांची टीकाmarat