Share

विवाहित महिलेचे जडले १७ वर्षाच्या मुलावर प्रेम, शारीरीक संबंध बनवले अन्…; महाराष्ट्र हादरला

असे म्हणतात प्रेम हे आंधळे असते. प्रेमात वय, जात, रंग बघत नाही. त्यामुळे कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशा प्रेमातून अनेक हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना महाराष्ट्रातील अकोल्यातून समोर आली ज्यामुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (29 year women love 17 year old boy)

अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे महिलेवर अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. १७ वर्षीय मुलासोबत घडलेल्या या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

२९ वर्षीय महिला पतीपासून वेगळी राहते, असे सांगितले जात आहे. बहिणीच्या मुलीला ती आपल्याजवळ ठेवत होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी महिला एका डाळ मिलमध्ये काम करते. जिथे ती एका अल्पवयीन मुलाशी भेटली होती. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

त्यानंतर दोघांनी एकमेकांनी शारीरिक संबंध सुद्धा बनवले. ३१ जानेवारी रोजी आरोपी महिला आपल्या बहिणीच्या मुलीला सोडून कुठेतरी निघून गेली होती. ९ वर्षीय मुलगी रडताना पाहून शेजाऱ्यांनी मावशीचा शोध सुरू केला. मात्र दोन दिवसांपासून तिचा काहीही पत्ता लागला नाही.

त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलेच्या हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. यादरम्यान एक अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. ज्याचा पोलीसही शोध घेत होते. मात्र ९ फेब्रुवारी रोजी मुलगा अचानक घरी परतला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.

मुलाची विचारपूस केल्यानंतर आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आली. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीरंगम यांनी सांगितले की, आरोपी महिलेची चौकशी केली जात आहे. त्यांचा जबाब नोंदवून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
सोमय्यांना आज फक्त ड्रामेबाजी करायची होती ती शिवसैनिकांनी हाणून पाडली, कोर्लई गावच्या सरपंचांची टीका
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या जावयाची सासूने केली हत्या, पुण्यातील धक्कादायक घटना
हत्या करुन सुप्रियाला सोफ्यात डांबणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी शोधले, एका चपलेवरुन झाला उलगडा

राज्य

Join WhatsApp

Join Now