एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारणही ढवळून निघाले आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. हे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही प्रयत्न करताना दिसून येत आहे. (25 shivsena mla want to meet cm)
तसेच दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांचा गट मजबूत होताना दिसत आहे. अनेक मंत्रीही शिंदे गटात सामील होताना दिसत आहे. त्यांनी महाविकास आघाडीतून पाठिंबा काढल्याचे सुद्धा म्हटले जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती तोडून उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती करावी असे आमदारांचे म्हणणे आहे.
शिवसेनेने भाजपशी युती केली नाही, तर बंडखोर आमदार एकतर भाजपमध्ये विलीन होतील किंवा प्रहार पक्षात जातील, असे म्हटले जात आहे. भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या फायद्याचा असल्याने ते तो निर्णय घेतील अशी चर्चा आहे.
असे असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोरी करणारे २५ आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या विचारावर नाराज असल्याचे म्हटले आहे. तसेच ते त्याला विरोधही करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून त्यांना नवा मार्ग काढण्याची इच्छा असल्याचीही माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे.
गुवाहाटीमध्ये असलेल्या २५ बंडखोर सेनेच्या आमदारांनी त्यांचा स्वतंत्र गट तयार केला आहे आणि त्यांना त्यांची ओळख फक्त शिवसेना आमदार म्हणून ठेवायची आहे. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हायचे नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटूया आणि मार्ग शोधूया असे म्हणत हा ग्रुप सक्रीय झाला आहे, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एक पाऊल मागे टाकताना दिसून आले आहे. त्यांनी एक निवेदन जारी करून बंडखोरांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, समोर या, चर्चा करू, बसून मार्ग काढू. आमदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. एकदा भेटून चर्चा केली तर नक्कीच यावर मार्ग निघेल.
महत्वाच्या बातम्या-
रोहित टी20 च्या कर्णधारपदावरून होणार मुक्त, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू होणार नवा कर्णधार
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला फोटो; म्हणाली, काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल ओकेमध्ये हाय!
२ लाखांची करकरीत रॉयल एनफिल्डची ‘ही’ बाईक फक्त २२ हजारात आणा घरी; वाचा भन्नाट ऑफर