Share

मोठी बातमी! बंडखोरी करणारे २५ आमदार मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता, गुवाहटीतच बनवलाय स्वतंत्र गट

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारणही ढवळून निघाले आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. हे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही प्रयत्न करताना दिसून येत आहे. (25 rebels mla want meet cm )

तसेच दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांचा गट मजबूत होताना दिसत आहे. अनेक मंत्रीही शिंदे गटात सामील होताना दिसत आहे. त्यांनी महाविकास आघाडीतून पाठिंबा काढल्याचे सुद्धा म्हटले जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती तोडून उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती करावी असे आमदारांचे म्हणणे आहे.

शिवसेनेने भाजपशी युती केली नाही, तर बंडखोर आमदार एकतर भाजपमध्ये विलीन होतील किंवा प्रहार पक्षात जातील, असे म्हटले जात आहे. भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या फायद्याचा असल्याने ते तो निर्णय घेतील अशी चर्चा आहे.

असे असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोरी करणारे २५ आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या विचारावर नाराज असल्याचे म्हटले आहे. तसेच ते त्याला विरोधही करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून त्यांना नवा मार्ग काढण्याची इच्छा असल्याचीही माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे.

गुवाहाटीमध्ये असलेल्या २५ बंडखोर सेनेच्या आमदारांनी त्यांचा स्वतंत्र गट तयार केला आहे आणि त्यांना त्यांची ओळख फक्त शिवसेना आमदार म्हणून ठेवायची आहे. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हायचे नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटूया आणि मार्ग शोधूया असे म्हणत हा ग्रुप सक्रीय झाला आहे, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एक पाऊल मागे टाकताना दिसून आले आहे. त्यांनी एक निवेदन जारी करून बंडखोरांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, समोर या, चर्चा करू, बसून मार्ग काढू. आमदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. एकदा भेटून चर्चा केली तर नक्कीच यावर मार्ग निघेल.

महत्वाच्या बातम्या-
केंद्र सरकारची भन्नाट योजना; पत्नीच्या नावाने खाते खोलून मिळवा दरमहा ४५ हजार रुपये
‘टाळं लावायला दोघं तरी ठेवा’; शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर माजी महिला महापौरची ठाकरेंवर संतप्त प्रतिक्रिया
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदे यांच्याकडे असेल उपमुख्यमंत्रीपद, वाचा संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now