गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला कर्नाटकातील हिजाबचा वाद पूर्णपणे संपलेला नाही. उच्च न्यायालयाने हिजाबवर बंदी घातली आहे. पण उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही महाविद्यालय आणि विद्यार्थी पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे दिसून आले आहे. (231 students dont seat in exam because of hijab)
राज्यातील उप्पिनगडी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये हिजाब परिधान करण्यास परवानगी नसल्यामुळे २३१ मुस्लिम विद्यार्थिनींनी परीक्षेला बसण्यास नकार दिला आहे. विद्यार्थ्यांना हिजाब घालून परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी इच्छा होती, परंतु महाविद्यालयाने परवानगी दिली नाही.
महाविद्यालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या आदेशाचा दाखला दिला आहे. ज्यामध्ये सहा मुस्लिम विद्यार्थिनींची याचिका फेटाळली ज्यांनी वर्गात हिजाब घालण्याची इच्छा व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे पीयू शिक्षण उपसंचालकांनी सांगितले.
आता महाविद्यालयात शुक्रवारी परीक्षा झाली. शुक्रवारी, हिजाब परिधान केलेल्या काही मुस्लीम मुली मंगळुरूपासून ५० किमी अंतरावर असलेल्या उप्पिनगडी येथील महाविद्यालयात आल्या असता महाविद्यालयाने त्यांना परीक्षा हॉलमध्ये जाण्यापासून रोखले. त्यामुळे कॉलेज कॅम्पसमध्ये तणाव निर्माण झाला आणि सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले.
त्या सर्व मुलींना हिजाब घालून परीक्षेला बसण्याची परवानगी पाहिजे होती, परंतू त्यांनी ती मिळाली नाही. परिसरातील मुस्लिम नेत्यांनीही विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे, मात्र अनेक मुस्लिम मुली परीक्षेला न बसताच परतल्या.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले की, २३१ द्वितीय वर्षाचे पीयू विद्यार्थी, ज्यात काही मुलांचाही समावेश आहे, ते परीक्षा न देताच निघून गेले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. होळीच्या सुट्टीनंतर या याचिकांवर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
MIM ची युतीची ऑफर आल्यानंतर उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश; म्हणाले, MIM चा कट उधळून लावा अन्..
प्रेयसीची समजूत काढण्यासाठी कॉल करून गळ्यात अडकवला फास, मोबाईल निसटला आणि लाईव्ह झाला मृत्यु
घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनुषने ऐश्वर्या रजनीकांतसाठी केली पोस्ट, एक्स पत्नीने दिली अशी प्रतिक्रिया






