Share

ठाण्यातील २२ नगरसेवक राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत, ६ नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश

Sharad Pawar Eknath Shinde

ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आधीच शिवसेनेचा खिंडार पडले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे तब्बल २२ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्या ठाण्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करायचं ठरवलं आहे. तब्बल २२ नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीची साथ सोडून शिंदे गटाच्या वाटेवर जाण्याची तयारी करत आहेत अशी माहिती मिळाली आहे.

हे २२ नगरसेवक वेगळा गट स्थापन करतील किंवा थेट बाळासाहेबांची शिवसेना या गटात सामिल होतील.  या २२ पैकी ६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धक्का देण्यासाठी शिंदे गटाने ही मोठी खेळी केली आहे.

मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. ठाणे मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना धक्का देण्याची तयारी करत आहे. यादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी ट्विट केले आहे की, जुन्या ठाणेकरांना क्लस्टर जबरदस्ती करणारे शिंदे सरकार क्लस्टरमध्ये न आल्यास जेलमध्ये टाकू अशी धमकी देत होते. पण वृत्तपत्रांनी बातमी उचलल्यानंतर माघार घेतली व विकासकामांना परत एकदा सुरुवात झाली.

क्लस्टर संपूर्ण ठाण्यात पसरले आहे ह्याच क्लस्टर अंतर्गत विविध पक्षातील नगरसेवकांच्या गळ्याशी फास आणून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे काम सुरु झाले आहे. कोणी काहिही म्हणो आजच्या जिवंत असलेल्या दोन पिढ्या सोडून दया. त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्यांना क्लस्टर बघायला मिळालं तर नशीब.

100 एकर मोकळ्या जमिनीवर लोढा आणि रुस्तमजी 20 वर्षे ईमारती बांधू शकले नाहीत. तर क्लस्टर कस काय होणार पुढच्या 50 वर्षांत? स्वप्न सत्यात उतरतील तेवढीच दाखवायची असतात. जनता मूर्ख नसते. क्लस्टर् मध्ये याच ही जबरदस्ती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या
आता राष्ट्रवादी टार्गेटवर! आव्हाडांच्या बालेकिल्ल्यातील २२ नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला
मालिका जिंकल्यावर रोहितने ‘या’ वृद्ध व्यक्तीकडे दिली ट्रॉफी; पहा भारताच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ
बागेश्वर धाम: माईंड रिडींग काय आहे? तुम्ही एखाद्याच्या मनातलं कसं ओळखू शकता? वाचा वैज्ञानीक ट्रिक
धीरेंद्रशास्त्रींकडे अदृश्य शक्ती आहे की काही युक्ती? माइंड रीडर सुहानी शहांनी live टेस्टद्वारे केला ‘हा’ दावा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now