बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने पहिल्या डावात 365 धावा केल्या. यादरम्यान संघाचे सहा खेळाडू शून्यावर बाद झाले. त्याचवेळी दोन खेळाडूंनी शतके झळकावली.
या दोन शतकांच्या जोरावर बांगलादेशचा संघ 365 धावांपर्यंत मजल मारू शकला. कसोटी क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका संघाचे सहा फलंदाज कसोटीच्या एका डावात शून्यावर बाद झाले आणि दोन फलंदाजांनीही शतक झळकावले. शून्यावर बाद झालेल्यांमध्ये बांगलादेशचा महमदुल हसन जॉय, तमीम इक्बाल, शाकिब अल हसन, मोसाद्देक हुसेन, खालिद अहमद आणि इबादत हुसेन यांचा समावेश आहे.
त्याचवेळी मुशफिकर रहीमने 175 धावांची नाबाद खेळी केली. रहिमने आपल्या खेळीत 355 चेंडू खेळले आणि 21 चौकार मारले. यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासने 246 चेंडूत 141 धावा केल्या. यामध्ये 16 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.
शांतो आठ आणि कर्णधार मोमिनुल हसनने नऊ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 506 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून ओशादा फर्नांडोने 57 धावा, कर्णधार दिमुथ करुणारत्नेने 80 धावा, अँजेलो मॅथ्यूजने 145 धावा, धनंजया डी सिल्वाने 124 धावा केल्या. मॅथ्यूज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. शेवटच्या कसोटीत त्याने 199 धावा केल्या आणि दुहेरी शतक हुकले.
प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने चार गडी गमावून 34 धावा केल्या होत्या. बांगलादेशचा संघ अजूनही श्रीलंकेच्या पहिल्या डावातील आघाडीच्या 107 धावांनी मागे आहे. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे.
दरम्यान, कसोटी राहिली बाजूला या अनोख्या रेकॉर्डचीच चर्चा सगळीकडे होती. ज्या प्रकारे बांगलादेशचे खेळाडू शुन्यावर बाद झाले आणि दोघांनी शानदार शतकं झळकवली त्यानंतर सगळेच प्रेक्षक थक्क झाले होते. अनेकांना तर विश्वासच बसत नव्हता की इतक्या वर्षांनंतर असा पराक्रम झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मला तुमची आठवण येते बाबा, तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये’; विलासरावांच्या आठवणीने रितेशला अश्रु अनावर
करणच्या पार्टीत प्रचंड बोल्ड अवतारात दिसली मलायका; लोक म्हणाले, कपडे घरी विसरले का? पहा फोटो
ऐश्वर्याने 30 वर्षांपुर्वी फक्त ‘एवढ्या’ पैशासाठी केले होते काम, 1992 च्या बिलाचा फोटो झाला व्हायरल
पुन्हा येणार साऊथचं वादळ! ‘हे’ चित्रपट मोडू शकतात KGF 2 चा 1 हजार कोटींचा रेकॉर्ड, वाचा यादी