Share

थरारक घटना! कोंबड्यांची झुंज सुरू असताना झाला अंदाधुंद गोळीबार; सणाच्या दिवशीच 19 जणांचा जागीच मृत्यू

अमेरिकेच्या मेक्सिको राज्यात गँगवॉरची घटना समोर आली आहे. येथे एका सणाच्या वेळी गोळीबार झाला असून त्यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १६ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. या घटनेत अनेक जण जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (19 people died in mexico)

सेंट्रल मेक्सिकोच्या ऍटर्नी जनरलच्या कार्यालयाने (एफजीई) दिलेल्या माहितीनुसार, मध्य मेक्सिको प्रदेशात रविवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. मिचोआकन राज्यातील लास टिनाज परिसरात हा गोळीबार झाला. इथे काही सणाच्या निमित्ताने लोक जमले होते. त्यावेळी बेकादेशीर असलेली कोंबड्यांची झुंज सुरु होती, ती सुरु असतानाच हा गोळीबार झाला आणि त्यात लोकांचा मृत्यु झाला.

मिचोआकनच्या सार्वजनिक सुरक्षा सचिवांच्या म्हणण्यानुसार, हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. मिचोआकान आणि त्‍याच्‍या शेजारी गुआनाजुआटो हे मेक्सिकोमध्‍ये २ सर्वात हिंसक राज्‍य आहेत.

तसेच अमली पदार्थांची तस्करी आणि चोरीच्या इंधन विक्री यांसारखे अनेक बेकायदेशीर कामे येथे होतात. यामध्ये सामील असलेल्या टोळ्यांमध्ये गँगवॉरच्या अनेक घटना अनेकदा समोर येत असतात. आताही झालेल्या या घटनेमुळे अनेकांचा जीव गेला आहे.

मेक्सिकोचे मिचोआकन राज्य हे एवोकॅडो नावाचे फळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. औषधी वापरामुळे हे फळ खूप महाग आहे. गेल्या महिन्यात मेक्सिकोमध्ये काम करणाऱ्या एका अमेरिकन अधिकाऱ्याला धमक्या आल्या होत्या. त्यानंतर अमेरिकेने या फळाची आयात एका आठवड्यापेक्षा जास्त काळ थांबवली होती.

गेल्या महिन्यात या राज्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. राज्याने याला गँगवार मानले. मिचोआकन मंत्री रिकार्डो मेजिया यांनी सांगितले की, जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलच्या एका गँगने दुसऱ्या गँगचा बदला घेण्यासाठी हा गोळीबार केला होता.

२००६ पासून मेक्सिकोमध्ये ड्रग कार्टेलशी संबंधित हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. इथे सरकारने लष्करासोबत अमली पदार्थ विरोधी मोहीमही चालवली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, तेव्हापासून आतापर्यंत ३ लाख ४० हजारांहून अधिक हत्या झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
PCL पेक्षा IPL च भारी, खुद्द पाकिस्तानी क्रिकेटरनेच दिली कबुली, सांगितलं चकित करणारं कारण
शेअर मार्केटमध्ये ‘या’ कंपनीने घातला धुमाकूळ; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे केले ७३ लाख, ७००० टक्के परतावा
के एल राहुलच्या मते हा खेळाडू आहे भारताचा एबी डिविलीयर्स; म्हणाला, ३६० डिग्री शॉट्स खेळण्यात सक्षम

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now