Share

एकाचवेळी १८ मुस्लिमांनी स्वीकारला हिंदू धर्म, शेणाने आणि गौमुत्राने अंघोळ करत केले ‘वेलकम बॅक’

मध्य प्रदेशमध्ये १५ दिवसांत मुस्लिमातून हिंदू झाल्याची दुसरी मोठी घटना समोर आली आहे. यावेळी रतलामच्या अंबामध्ये १८ जणांनी मुस्लिम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला. या कुटुंबाचा प्रमुख मोहम्मद शाह आता रामसिंग झाला आहे. गुरुवारी भीमनाथ मंदिरात महाशिवपुराण पूर्ण झाल्यानिमित्त स्वामी आनंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत सर्वांनी शेण व गौमुत्राने स्नान करून हिंदू धर्म स्वीकारला आहे. (18 muslim convert in hindu)

त्यापूर्वी सर्वांनी प्रतिज्ञापत्र तयार केले होते. यामध्ये त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय धर्म बदलण्याबाबत लिहिले आहे. यापूर्वी या कुटुंबाच्या प्रमुखाने स्वामी आनंदगिरीकडे धर्मांतर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अवघ्या १३ दिवसांपूर्वी शेख जफर शेख यांचे वडील गुलाम मोईनुद्दीन शेख यांनी मंदसौरमध्ये हिंदू धर्म स्वीकारला. आता ते चेतन सिंग राजपूत या नावाने ओळखले जातात. त्यांची पत्नी आधीपासूनच हिंदू धर्माची आहे. शेख जफरने भगवान पशुपतीनाथ मंदिराच्या प्रांगणात धर्म स्वीकारला होता.

मोहम्मद शाह (५५) हे औषधी वनस्पती आणि ताबीज विकण्याचे काम करायचे, आता त्यांनी कुटुंब आणि नातेवाईकांसह धर्म स्वीकारला. त्याआधी त्यांनी स्वामी आनंदगिरी महाराज यांची भेट घेऊन धर्मांतर करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर शाह यांनी न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र दिले होते.

भीमनाथ मंदिराजवळील तलावात स्वामीजींनी संपूर्ण कुटुंबाला शेण आणि गौमुत्राने स्नान घातले. तसेच दोरा बांधून भगवी वस्त्रे परिधान करून जय श्रीराम, जय महाकाल, सनातन धर्माच्या घोषणा देण्यास सांगितले. धर्मांतरानंतर मोहम्मद शाह आता रामसिंग झाले आहे.

रामसिंग यांनी सांगितले की, दोन-तीन पिढ्यांपूर्वी त्यांचे कुटुंबीय हिंदूधर्मीयच होते. यानंतर रोजगाराच्या शोधात त्यांनी वनौषधी विकणे, ताबीज बनवणे असे काम सुरू केले आणि मुस्लिम धर्म स्वीकारला. काही काळ गावात राहिल्यानंतर हिंदू धर्माची आवड वाढू लागली. गावात महाशिवपुराण कथेच्या वेळी स्वामीजींनी धर्म परिवर्तनाबद्दल सांगितले. आता कुटुंब आणि नातेवाईकांनी मिळून धर्म स्वीकारला आहे.

धर्मांतरानंतर मोहम्मद शाह राम सिंग आणि त्यांचा मुलगा मौसम शाह अरुण सिंग बनले. तसेच शाहरुख शाह आता संजय सिंग झाला आहे. नजर अली शाह राजेश सिंह, नवाब शाह मुकेश सिंह, पत्नी शायराबी शायराबाई, सून शबनम सरस्वतीबाई अशाप्रकारे सर्वजणांनी आपली नावे बदलून घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याने घेतला भावाच्या ‘अपमानाचा’ बदला दिनेश कार्तिककडून? 3 वर्ष जुनी घटना झाली ताजी
त्याने कॅच सोडला म्हणून सामना हारलो नाही तर.., श्रेयस अय्यरच्या समर्थनार्थ इशान किशन मैदानात
Crorepati Tips: आजच चहा पिणे सोडून द्या, ‘असे’ व्हा करोडपती, मग करा मज्जाच मज्जा!

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now