Share

औरंगाबादच्या शेतकऱ्याला पावले नरेंद्र मोदी; जनधन खात्यात जमा झाले १५ लाख, पण..

२०१४ च्या लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक वक्तव्य केले होते. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते, की भारतात इतका काळापैसा आहे, की सामान्य नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख जमा झाले असते. तसेच आपण तो सर्व काळापैसा परत आणणार असेही मोंदीनी म्हटले होते. (15 lakh credited in auragabad farmer)

त्यामुळे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वजण आपल्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्याची अजूनही वाट बघताना दिसतात. तसेच या वक्तव्यावरुन विरोधी पक्ष त्यांच्यावर जोरदार टीका करतान दिसतात. पण आता औरंगाबादमध्ये एक हैराण करणारी घटना घडली आहे.

औरंगाबादमधील एका शेतकऱ्याच्या खात्यात खरोखरच १५ लाख रुपये जमा झाले आहे. त्यामुळे हा शेतकरी राज्यभरात चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्याच्या खात्यात १५ लाख पाठवले असावे. असे त्याला वाटले आणि त्याने त्या पैशांमधून घरही बांधले आहे. पण नंतर एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.

औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वर औटे या शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर १५ लाख रुपये जमा झाले आहे. खात्यावर १५ लाख जमा झाल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यामुळे त्याने त्यातील काही रक्कम काढून आपले घर बांधले. पण काही दिवसानंतर एक वेगळेच सत्य समोर आले आहे.

बँक प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन या शेतकऱ्यांसमोर हात जोडून विनंती करत आहे की ते पैसे परत द्या. कारण ते पैसे बँकेकडून चुकून त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले होते. औटे यांच्या जनधन खात्यावर काही महिन्यांपूर्वी १५ लाख रुपये जमा झाले होते. चुकून कोणाचे आले असावे म्हणून त्यांनी काही महिने वाट बघितली, पण खात्यातून ते पैसे वगळते झाले नाही.

त्यामुळे आनंदी झालेल्या औटे यांनी खात्यातून ९ लाख रुपये काढून घर बांधले. त्यानंतर आता बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांना ते लक्षात आले की हे पैसे पिंगळवाडी ग्राम पंचायतीच्या खात्यात हे पैसे जमा करायचे होते. तसेच पैसे ज्ञानेश्वर यांच्या खात्यात चुकून पैसा जमा केले. आता त्यांना त्यांची चुक लक्षात आल्यामुळे ते ज्ञानेश्वर औटेंना पैसे परत करण्याची विनंती करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
40 हजारांच्या व्याजापोटी वसूल केले 8 लाख; सावकाराने वृद्ध महिलेला अक्षरश भीक मागायला लावली
ह्युंदाईनंतर केएफसीनेही केले काश्मीरबद्दल ट्विट; संतापलेले नेटकरी म्हणाले, भारत सोडून निघून जा तुम्ही
अखेर ठरलं! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बांधणार लग्नगाठ? ‘या’ ठिकाणी होणार थाटामाटात लग्न

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now