BJP vs JMM | झारखंडमध्ये लवकरच मोठ्या राजकीय बदलाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) १६ आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) सोमवारी केला आहे. दुसरीकडे, भाजपने हा खळबळजनक दावा हास्यास्पद व पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले.
तसेच झारखंड मुक्ती मोर्चा स्वतःच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी JMM च्या २१ आमदारांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० शिवसेना व १० अपक्ष आमदारांना सोबत घेऊन भाजपशी हातमिळवणी केली.
त्यानंतर आता झारखंडमध्ये देखील जवळपास अशीच परिस्थिती भाजपसंदर्भात बघायला मिळत आहे. JMM च्या केंद्रीय समितीचे सदस्य सुप्रियो भट्टाचार्य यांनी सोमवारी रांची येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यतील भाजपाचे नेतृत्व आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यावर नाराज झालेल्या १६ भाजप आमदारांनी वेगळा गट तयार करून JMM मध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला आहे.
पुढे ते म्हणाले की, पक्षाने यावर गांभीर्याने विचार करण्याचे ठरवले आहे. जर भाजपचे ते १६ आमदार स्वतंत्र गट स्थापन करून सरकारला पाठिंबा देण्यास तयार असतील तर झामुमो त्यांचे स्वागत करेल. पत्रकारांनी भट्टाचार्य यांना झामुमोच्या अनेक आमदारांच्या सरकारवरील नाराजीबद्दल विचारले.
त्यावर ते म्हणाले की, आमचा पक्ष पूर्णपणे एकत्रित आहे. राष्ट्रपती निवडणुकीत पक्षाच्या सर्व ३० आमदारांनी पक्षाच्या निर्णयानुसार एकत्र मतदान करून याचा पुरावाच दिला आहे. दुसरीकडे, झामुमोच्या प्रवक्त्याच्या या दाव्यावर भाजपने लगेचच प्रत्युत्तर दिले. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रतुलनाथ शाहदेव म्हणाले की, लूट आणि लूटमार करणाऱ्या झामुमोच्या सरकारचा पाया खोट्या गोष्टींवर आधारित आहे.
पक्षाचे आमदार लोबिन हेम्ब्रम आणि सीता सोरेन यांनी त्यांच्याच सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांवर सरकारकडे उत्तर नाही. हा पक्ष स्वतःच संपणार आहे. त्यामुळे त्यांना भाजप आमदारांची काळजी करण्याची गरज नाही.
इकडे भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी सोमवारी ट्विट केले की JMM सरचिटणीस पंकज मिश्रा तुरुंगात गेल्याने पक्षाला धक्का बसला आहे. झामुमोच्या २१ आमदारांनी बंड केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातच बंडखोरी आहे. म्हणूनच हे खयाली पुलाव बनवत आहेत. भाजप चोरांच्या टोळीशी आणि भ्रष्ट पक्षाशी लढत आहे. भाजप कार्यालयातील मच्छरही झामुमोचा द्वेष करतात.
आणखी एका ट्विटमध्ये निशिकांत दुबे म्हणाले की, यावेळी भाजपचे सरकार येताच दुर्गा सोरेन, सुनील महतो, निर्मल महतो, विनोद बिहारी महतो यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी केली जाईल. आमदार लोबिन हेमब्रम यांना न्याय दिला जाईल. तसेच सायमन मरांडी, ए के राय, रामदयाल मुंडा यांना सन्मान देण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
Mahesh shinde: राष्ट्रवादीचं खळं उठलय, वस्ती उठायला वेळ लागणार नाही; शिंदेंची राष्ट्रवादीला थेट धमकी
आली रे आली आता भाजपची बारी आली! आता भाजपचेच तब्बल १६ आमदार फुटणार
खेळ खल्लास! मुलगा ड्रग्ससाठी मागायचा पैसै, वडिलांनी इलेक्ट्रिक करवतीने तुकडे करून दिले फेकून
आमदार लांडगेंचा ‘आखाड’! २१०० किलो मटन, तेवढेच चिकण, १२३० किलो मासे, १३ हजार अंडी; ७० हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था