Share

शिवसेनेत मोठा भूकंप होणार; उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा दिल्लीचा डाव झाला उघड

uddhav thackeray

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे. शिवसेनेचे काही खासदार पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले. मात्र हा आकडा कमी असल्याने किमान १४ खासदारांची बंडाची मानसिकता होईपर्यंत गुप्तता पाळण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वीच सेनेच्या १४ खासदारांची एक यादी तयार करण्यात आली आहे. विधानसभेतील शिंदे यांच्याप्रमाणेच हा मोठा गट शिवसेनेतून सोमवारी बाहेर पडणार आहे. हा गट स्वतंत्र राहणार असल्याच देखील बोललं जातं आहे.

या गटाच्या प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. हा गट आपल्या नव्या गटाची यादी सोमवारी लोकसभा अध्यक्षांना सादर करणार असल्याच देखील बोललं जातं आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला जबर धक्का बसणार आहे.

दरम्यान, सेनेचे लोकसभेत १८ खासदार आहेत. मात्र हा आकडा कमी असल्याने किमान १४ खासदारांची बंडाची मानसिकता होईपर्यंत गुप्तता पाळण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येणाऱ्या दोन दिवसात याबाबत मोठी घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आणखी एक धक्का पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर बसला आहे.

आता खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होऊ लागल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील शिवसेनेच्या ४० आमदारांपाठोपाठ आता खासदार देखील बंडाच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे आगामी काळात राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या
हातातले शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल; पक्ष सोडतानाही शिवसेना नेत्याची भावूक प्रतिक्रिया
तुमच्या ‘या’ सवयींमुळे वयाच्या आधीच तुम्ही दिसू शकता म्हातारे; वाचा त्यावरील उपाय …
शाहरूख आणि काजोलबद्दल उडाली ‘ही’ अफवा, ऐकल्यावर अजय देवगणलाही लागेल मिर्ची
सोशल मीडियाचा वापर करत ‘या’ चार तरुणांनी उलथवून टाकली श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबाची सत्ता

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now