सोशल मीडियावर अभिनेत्रींना बलात्काराच्या धमक्या मिळणे हे अगदी सामान्य झाले आहे. टीव्ही मालिका ‘पंड्या स्टोर’ची अभिनेत्री सिमरन बुधरूपसोबतही अशीच एक घटना घडली आहे. सिमरन या शोमध्ये ऋषिताची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते, पण ते निगेटीव्ह पात्र असल्यामुळे तिला लोकांच्या अश्लील कमेंट्सला बळी पडावे लागत आहे. (13 year old threating pandya store actress)
अनेक वेळा आपण टीव्ही मालिकांमध्ये साकारलेल्या पात्रांशी स्वतःला खूप जोडतो. इतकं जोडलं गेलं की शोमधील खलनायक खऱ्या आयुष्यातही तसेच असल्याचे वाटते. अनेकवेळा ही पात्रं मनावर इतकी परीणाम करतात की, स्टार्सला शिवीगाळ करायलाही लोक मागेपुढे पाहत नाहीत. सिमरन बुधरूपने देखील ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान असाच अनुभव शेअर केला आहे.
‘पंड्या स्टोअर’ अभिनेत्री सिमरन म्हणते की, तिला सोशल मीडियावर तरुण पिढीकडून सातत्याने बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आजच्या पिढीतील एक गट तिला सोशल मीडियावर टार्गेट करून सतत शिवीगाळ करत असल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे ती इतकी नाराज झाली की तिला पोलीस ठाण्यात जावे लागले.
अभिनेत्रीने सांगितले की, सुरुवातीला ती ट्रोलर्सना हलक्यात घेत होती. मात्र प्रकरण मर्यादेपलीकडे गेल्यावर तिला पोलिसांची मदत घेण्यासाठी जावे लागले. सिमरन सांगते की ती या शोमध्ये नकारात्मक भूमिका करत होती. म्हणूनच ती अशा कमेंट्ससाठी आधीच तयार होती.
पुढे ती म्हणाली की, मालिकेतील एका ट्रॅकदरम्यान रवी आणि देव यांचे नाते तिच्यामुळे तुटते असे दाखवण्यात आले होते. त्यावेळी लोक तिला वाईट म्हणू लागले. मुलाखतीत अभिनेत्रीने असेही म्हटले आहे की, तिला धमकी देणारे मुलं हे फक्त १३-१४ वर्षांचे होते.
सिमरन सांगते की, पालक मुलांना अभ्यासासाठी फोन देतात, पण असे करून ते पालकांचा विश्वास तोडतात. दरम्यान, अशी अपेक्षा आहे की लोक अभिनेत्रीची नकारात्मक भूमिका सीरियलपुरतीच मर्यादित ठेवतील, कारण हे तिचे काम आहे आणि ते मनावर घेणे चुकीचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
अक्षयला आधीच कळलं होतं ‘पृथ्वीराज’ फ्लाॅप होणार; दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
थांबायचं नाय गड्या थांबायचा नाय..; दे धक्का २ ‘या’ तारखेला होणार रिलीज; पहा धमाकेदार टिझर व्हिडीओ
पुतिन यांचे बॉडीगार्ड त्यांची पॉटी आणि मुत्र पाठवतात रशियाला, वॉशरूमला गेल्यावर करत नाहीत फ्लश