Share

धक्कादायक! १३ वर्षाच्या मुलीवर १६ जणांनी केला बलात्कार; भयानक घटनाक्रम ऐकून पोलिसही हादरले

राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. जोधपूरमध्ये १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना घडली होती. असे असतानाच भरतपूरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १६ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

ही मुलगी जंगलात शेळ्या चरण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला आहे. पीडित मुलीने नातेवाईकांना सांगितले की, एकाने तिचा चेहरा दाबला आणि दुसऱ्याने तिला चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. यानंतर आणखी काही लोकही आले आणि त्यांनी निष्पाप मुलीवर बलात्कार केला.

कुटुंबीयांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता मुलीचे मेडिकल करण्यात आले. खरंतर ही घटना भरतपूरच्या खोह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलगी ११ फेब्रुवारी रोजी जंगलात शेळ्या चरण्यासाठी गेली होती.

मुलगी घरी न परतल्याने वडिलांनी आजूबाजूला तिचा शोध सुरु केला. १२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता मुलीची नोंद करण्यासाठी त्यांनी खोह पोलिस स्टेशन गाठले. त्यावेळी मुलगी घरी परतल्याचे त्यांनी बघितले. मुलीने घरी परतून आपल्या कुटुंबीयांना आपल्यासोबत घडलेली धक्कादायक घटना सांगितली. यानंतर वडिलांनी १३ फेब्रुवारीला गँगरेपची तक्रार दाखल केली.

याआधी जोधपूर जिल्ह्यातून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती.पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीलाही अटक केली आहे. ही घटना जोधपूरमधील मंडोर पोलीस स्टेशन परिसरात घडली होती.

पोलिसांनी सांगितले की, सध्या पश्चिम बंगालमधील रहिवासी आरोपी आझाद हुसैन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी केली जात आहे. तसेच पोलिसांनी पीडितेचे मेडिकलही करून घेतले आहे.अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी आरोपीने मुलीला सोबत नेले आणि नवीन चप्पल घेऊन देतो असे म्हणत तिच्यावर बलात्कार केला.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: तीन दिवसांपासून रस्त्यावर पोलिस दिसले नाही म्हणून दारुड्याने केला पोलिसांना फोन; म्हणाला…
शेअर मार्केटमध्ये ‘या’ कंपनीने घातला धिंगाणा, गुंतवणूकदारांना केले मालामाल; १ लाखाचे केले ६६ लाख
शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर; तीन जण ताब्यात

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now