नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही १२ वीचा निकाल चांगला लागला आहे. पण काही विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहे. अनेकदा परीक्षेत नापास झाल्यानंतर विद्यार्थी निराश होत असतात. पण तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. (12 fail student cource)
आज आम्ही तुम्हाला अशा काही कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, ज्याने तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करु शकतात. त्यामध्ये काही कोर्सेस हे तीन वर्षांचे सुद्धा आहे. या कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन तुम्ही चांगले करीअर बनवू शकतात. तसेच भविष्यात त्यातून चांगली कमाई करु शकतात.
१. आयटीआय डिप्लोमा कोर्सेस- तुम्ही जर बारावीमध्ये फेल झाला असाल, तर तुम्हाला तांत्रिक क्षेत्रात करीअर करता येऊ शकते. त्यासाठी तुम्ही आयटीआय करु शकतात. भारत सरकारने प्रत्येक शहरात आणि गावात आयटीआयची केंद्रे उघडली आहे. हा कोर्स करुन तुम्ही सरकारी नोकरीही मिळवू शकतात.
२. कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्सेस- कॉम्प्युटर कोर्समध्येही तुम्ही करीअर करु शकतात. डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर तुम्ही कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स करु शकतात. त्यात तुम्ही कॉम्प्युटर, हार्डवेअर, नेटवर्किंग, मोबाईल, एचटीएमएल, व्हिडिओ एडिटींग या विषयांचा अभ्यास तुम्ही करु शकतात.
३. ऍनिमेशन डिप्लोमा कोर्स- सध्या मीडियात ऍनिमेशनचा वापर वाढत आहे. त्यामुळे या विद्यार्थी या क्षेत्रात चांगले करीअर करु शकतात. चित्रपट, जाहिरातींमध्ये ऍनिमेशनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दहावीच्या बेसवरही या कोर्समध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकतात.
४. डिझायनिंगमधील डिप्लोमा कोर्सेस- दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही डिझायनिंगच्या कोणत्याही पदवीच्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. डिझाईनमध्ये तुम्ही ग्राफिक्स डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग या गोष्टी तुम्ही शिकू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
“सोमय्या यापुढे जर मुख्यमंत्र्यांबाबत बोलला तर थोबाड लाल केल्याशिवाय राहणार नाही”
ईशा गुप्ताचे बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचं झालं पाणी पाणी, ओलांडल्या सर्व मर्यादा
VIDEO: पठाणच्या लांब केसांच्या लुकनंतर शाहरूख खानचा नवा लुक आला समोर, छत्रीने लपवण्याचा केला प्रयत्न