टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा डाव ४३.५ षटकांत सर्वबाद १७६ धावांवर आटोपला. युझवेंद्र चहलने चार आणि वॉशिंग्टन सुंदरने तीन बळी घेतले. (1000 one day match india team)
प्रत्युत्तरात भारताने २८ षटकांत ४ गडी गमावून वेस्ट इंडिजने दिलेले लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावा केल्या. सूर्यकुमार यादव ३४ आणि तर दीपक हुडा ज्याने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला तो २६ धावांवर नाबाद राहिला. इशान किशनने २८ धावा केल्या.
विराट कोहली पुन्हा फ्लॉप ठरला आणि त्याला केवळ ८ धावा करता आल्या. ऋषभ पंतने ११ धावा केल्या. २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी भारताला या वर्षी दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी आणि तीन वनडेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या फॉरमॅटमधील भारतीय क्रिकेट संघाचा हा १००० वा सामना होता. जगात प्रथमच एका संघाने १००० एकदिवसीय सामने खेळण्याचा टप्पा गाठला आहे.
टीम इंडियाचा हा १००० वा एकदिवसीय सामना होता, जो विजयासह कायमचा लक्षात राहणार ठरला आहे. टीम इंडिया १००० एकदिवसीय सामने खेळणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. भारताने पहिला वनडे १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. ४८ वर्षांच्या एकदिवसीय इतिहासात, मॅन इन ब्लूने दोन विश्वचषक (१९८३, २०११) जिंकले आहेत. भारतीय संघाने २००० आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती.
भारताने आतापर्यंत १००० एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान संघाने ५१९ विजयांची नोंद केली, तर ४३१ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. ९ सामने टाय झाले आणि ४१ निकाल लागले नाहीत. भारतानंतर सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा ऑस्ट्रेलिया (९५८) दुसरा संघ आहे. तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ९३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप जिंकल्याबद्दल BCCI कडून भारतीय संघाला मिळणार बंपर गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार ४० लाख अन्…
१९८३ चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या खेळाडूंना द्यायला BCCI कडे नव्हते पैसे, तेव्हा लता दीदींनी दिले होते २० लाख
गरीबी लय वाईट! जन्मदात्या आईवर आली बाळाला विकण्याची वेळ आली; वाचा असं नेमकं काय घडलं?