Share

मोठी बातमी! एकनाथारावांसोबत पक्षांतर केलेले १० सहकारी पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र

eknatha khadse

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी जळगावातून समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. खडसे यांचे तब्बल दहा नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

भुसावळ नगरपालिकेमधील एकनाथ खडसे समर्थक आणि माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना रात्री नऊ वाजता त्या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहे.

यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात खळबळ उडाली आहे. यामुळे खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे. याचे पडसाद आगामी महानगर पालिका निवडणुकीत कसे उलटतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाचा नेमकं घडलं काय?  खडसे यांचे दहा नगरसेवक अपात्र का ठरले?

2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर रमण भोळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तर त्यांच्यासोबतच भाजपातर्फे प्रमोद नेमाडे, शोभा नेमाडे, अमोल इंगळे, एड. बोधराज चौधरी , किरण कोलते , मेघा वाणी ,लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, शालिनी नारखेडे हे भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच 10 नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणीभाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी केली होती.

दरम्यान, काल या याचिकेवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यात तत्कालीन नगराध्यक्ष तथा खडसे समर्थकांसह दहा नगरसेवकांना अपात्र ठरण्यात आले आहे. यामुळे आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर  खडसे गटाला मोठा धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
हातातले शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल; पक्ष सोडतानाही शिवसेना नेत्याची भावूक प्रतिक्रिया
तुमच्या ‘या’ सवयींमुळे वयाच्या आधीच तुम्ही दिसू शकता म्हातारे; वाचा त्यावरील उपाय …
शाहरूख आणि काजोलबद्दल उडाली ‘ही’ अफवा, ऐकल्यावर अजय देवगणलाही लागेल मिर्ची
सोशल मीडियाचा वापर करत ‘या’ चार तरुणांनी उलथवून टाकली श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबाची सत्ता

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now